टेलिव्हिजनची स्टाइल आयकॉन हिना खानने सेक्सिएस्ट आशियाई वूमन 2019 च्या यादीत तिसर्या क्रमांक पटकावला आहे. हिना ने बॉलीवूड अॅक्ट्रेस कॅटरीना कॅफला मागे टाकले आहे. लंडनच्या एका मॅगझिन द्वारे जाहीर करण्यात आलेल्या एका ऑनलाईन वोटिंगच्या परिणामानुसार हिना हिला तिसर्या सेक्सिएस्ट आशियाई वूमन असल्याचा मान मिळाला आहे तर नंबर वनवर कोण आहे जाणून घ्या:
आलिया भट्ट सेक्सिएस्ट आशियाई वूमन 2019 च्या यादीत प्रथम स्थानावर आहे.
आलिया भट्टनंतर दुसर्या क्रमांकावर दीपिका पादुकोण आहे तिसर्यावर हिना खान.
चौथ्या क्रमांकावर पाकिस्तानी अॅक्ट्रेस माहिरा खान आहे.
तर पाचव्या क्रमांकावर टीव्ही अॅक्ट्रेस सुरभी चंदना आहे.
कॅटरीना कॅफ या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.
उल्लेखनीय आहे की हिना खान नेहमी आपल्या फॅशन सेंस आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. टीव्हीमध्ये आपली ओळख निर्माण केल्यानंतर आता ती चित्रपटात डेब्यू करणार आहे. हिना लवकरच 'लाइन्स' चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये डेब्यू करत आहे.