Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Russia-Ukraine War: कीव शहराच्या मध्यभागी जोरदार स्फोट, 10 इराणी ड्रोन पाडण्याचा दावा

webdunia
, बुधवार, 14 डिसेंबर 2022 (19:44 IST)
युक्रेनची राजधानी कीवमध्ये पुन्हा एकदा मोठा आवाज ऐकू आला आहे. रशियाने अनेक इराणी ड्रोनवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कीवच्या महापौरांनी वेगळाच दावा केला आहे. रशियाने पाठवलेले 10 इराणी ड्रोन आम्ही पाडले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रशियाच्या या हल्ल्यात युक्रेनच्या दोन सरकारी इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. या हल्ल्यात किती लोक जखमी झाले आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. कीव स्थानिक अधिकारी विटाली क्लिट्स्को यांनी टेलीग्रामवर एका पोस्टमध्ये लिहिले की स्फोटांनंतर महापालिकेचे पथक आले होते. या हल्ल्यात इराण बनावटीच्या 'शहीद' ड्रोनचा सहभाग असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. युक्रेनच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की रशियन सैन्याने देशात इतरत्र हल्ले केले आहेत.
 
युक्रेनला युद्धात आणखी एका विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. युक्रेनचे उप गुप्तचर प्रमुख जनरल वदिम स्किबित्स्की यांनी सांगितले की, 1990 मध्ये सोव्हिएत युनियनपासून विभक्त झाल्यानंतर युक्रेनने रशियाला दिलेली क्षेपणास्त्रे ऑक्टोबरपासून रशिया त्यांच्यावर हल्ला करत आहे.
 
रशियाने इराणी ड्रोनच्या सहाय्याने युक्रेनची विविध शहरे उद्ध्वस्त केली आहेत. परिस्थिती बिकट बनली आहे. रशियाने ओडेसा येथे इराणच्या ड्रोनमधून नवीन हल्ला केला. त्यामुळे सुमारे १५ लाख लोकांच्या घरातून वीज गेली. या लोकांना अंधारात राहावे लागत आहे. 
 
Edited by - Priya Dixit  
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उज्जैनच्या श्री महाकाल महालोक आणि महाकालेश्वर मंदिरात Jio True 5G सेवा सुरू