Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Russia Ukraine War: युक्रेनची राजधानी कीव्हवर रशियाने डागली क्षेपणास्त्र, दोन स्फोट झाले

Russia Ukraine War: युक्रेनची राजधानी कीव्हवर रशियाने डागली क्षेपणास्त्र, दोन स्फोट झाले
, मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 (20:22 IST)
रशिया आणि युक्रेन गेल्या नऊ महिन्यांपासून सतत एकमेकांवर बॉम्बफेक करत आहेत. दोघांमध्ये बोलणी करून समेट घडवून आणण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण ते अयशस्वी झाले. दरम्यान, मंगळवारी युक्रेनची राजधानी कीवमध्ये दोन स्फोट झाल्याचे वृत्त आहे. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की मंगळवारी कीवमध्ये किमान दोन स्फोट ऐकू आले आणि शहरातून धुराचे लोट उठताना दिसले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी बाली येथे G20 नेत्यांना व्हिडिओ संबोधित केल्यानंतर संपूर्ण युक्रेनमध्ये हवाई हल्ल्यांचा इशारा दिल्यानंतर हे स्फोट झाल्याचेही अहवालात म्हटले आहे.
 
रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला केला आहे. शहरात स्फोटाचे आवाज ऐकू येत आहे आणि सगळीकडे धूर पसरला आहे. शहराचे महापौर विटाली किच्छको यांनी दिलेल्या माहितीनुसा पेश्रेक भागातील दोन निवासी इमारती या हल्ल्याला बळी पडल्या आहेत.
 
सध्या जागतिक पातळीवरचे सर्व महत्त्वाचे नेते G-20 परिषदेसाठी इंडोनेशियामध्ये आहेत. तिथे सर्वांनी एकत्रितपणे युक्रेन युद्धाचा निषेध केला आहे. गेल्या आठवड्यात खेरसोन भागातून रशियाने सैन्य परत घेतले होते. त्यानंतर एका आठवड्यात हा मोठा हल्ला झाला आहे.
 
युक्रेनने अनेक क्षेपणास्त्र हाणून पाडले आहेत आणि बचावपथक त्यांचं काम करत आहे, असं महापौर पुढे म्हणाले.
 
रशियाने तीन दिशांना क्षेपणास्त्र डागल्याची माहिती मायक्लोविवचे महापौर विटाली किम यांनी दिली. या युद्धात प्रदीर्घ युद्धामुळे दोन्ही पक्षांचे मोठे नुकसान होत आहे.युक्रेन युद्धात एक लाखाहून अधिक रशियन सैनिक मारले गेले किंवा जखमी झाले.  
 
Edited by - Priya Dixit   
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IPL 2023: सर्व संघांनी रिटेन ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली, कोणत्या संघात काय बदल झाले जाणून घ्या