सर्व पौर्णिमांपैकी शरद पौर्णिमेचं विशेष महत्त्व आहे. नवरात्री संपल्यानंतर शरद पौर्णिमा येते. हिंदू पंचांगानुसार आश्विन महिन्याच्या पौर्णिमा तिथीला शरद पौर्णिमा सण साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार ही पौर्णिमा भगवान विष्णूंच्या चार महिन्याच्या शयन काळाचा अंतिम चरण असल्याचे मानले गेले आहे. या दिवशी चंद्र आपल्या 16 कला पूर्ण असून चंद्राच्या प्रकाशाने अमृत वर्षा होते.
धार्मिक मान्यता
पौराणिक मान्यतेनुसार शरद पौर्णिमेच्या मध्यरात्री चंद्राच्या सोळा कलांहून अमृत वर्षा झाल्यावर दवच्या रूपात अमृत थेंब दुधाच्या पात्रात पडतात, परिणामस्वरूप हे दूध अमृत तुल्य होतं. हे प्रसाद रूपात ग्रहण करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं आणि शरीराचा तेज वाढतो.
वैज्ञानिक मान्यता
शरद पौर्णिमेच्या रात्री गच्चीवर दूध किंवा खीर ठेवल्यामागे वैज्ञानिक तथ्य देखील आहे. खीर दूध आणि तांदळाने तयार होते. दुधात लॅक्टिक नामक आम्ल असतं. हे तत्त्व चंद्राच्या किरणांपासून अधिक प्रमाणात शक्तीचे शोषण करतं. तसेच तांदळात स्टार्च असल्यामुळे ही प्रक्रिया सोपी होते. या कारणामुळेच शतकांपासून ऋषी मुनींनी कोजागरी पौर्णिमेच्या रात्री खुल्या आकाशाखाली खीर ठेवण्याचे विधान केले आहे आणि या खिरीचे सेवन करणे आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले आहे. एका आणखी वैज्ञानिक मान्यतेनुसार या दिवशी दुधाने तयार उत्पादाचे चांदीच्या पात्रात सेवन केले पाहिजे. चांदीमध्ये रोग प्रतिकारशक्ती अधिक असते. याने विषाणू दूर राहतात.
शरद पौर्णिमा उपाय
खिरीत मिश्रित दूध, साखर आणि तांदळाचा घटक देखील चंद्र आहेत म्हणून यावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो. परिणामस्वरूप कोणत्याही जातकाच्या जन्म कुंडलीत चंद्र कमजोर असेल, महादशा-अंतर्दशा किंवा प्रत्यंतर्दशा चालत असेल किंवा चंद्र सहाव्या, आठव्या किंवा बाराव्या भावात असेल तर चंद्राची पूजा करत स्फटिक माळेने ॐ सों सोमाय या मंत्राचा जप करावा अशाने चंद्रजन्य दोष शांत होतात.
शरद पूर्णिमा महत्त्व
- चातुर्मासात जेव्हा प्रभू विष्णू शयन मुद्रेत असतात तेव्हा पृथ्वीवर उपासमार, दारिद्र्य आणि दुष्काळाची देवी 'अलक्ष्मी' चे साम्राज्य असतं आणि यासोबतच प्रलयाचे तीन इतर देवता, ताप जन्य आजारांचे स्वामी रुद्र, भूस्खलन पूर आणि दुष्काळाचे स्वामी वरुण आणि इतर आजार, अपघात आणि अकाल मृत्यूचे स्वामी यम यांचं पृथ्वीवर तांडव असतो. या काळात देवप्राण कमजोर असतात आणि आसुरी शक्तींचे वर्चस्व वाढवले असतात. परिणामस्वरूप पृथ्वीवर पाप अजून वाढू लागतात.
- शक्ती पूजेचा उत्सव नवरात्रीच्या नव्या दिवशी सिद्धीदात्री देवीची आराधना केल्यावर जेव्हा दशमी तिथीला व्रत पारण होतो तर पुढल्या दिवशी विष्णूप्रिया 'पापांकुशा' एकादशीच्या दिवशी देवी लक्ष्मी पापांवर अंकुश लावणे आरंभ करते.
- पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा प्रभू कृष्ण आपल्या नऊ लाख गोपांसमवेत स्वत:चे नऊ लाख वेगवेगळ्या गोपी रूपात महारास करत असतात तेव्हा देवी महालक्ष्मी पृथ्वीवर घरी-घरी जाऊन सर्वांना दुःख दारिद्र्यापासून मुक्तीचा वरदान देते परंतू ज्या घरात सर्व प्राणी झोपत असतात तेथून 'लक्ष्मी' दारातूनच परत जाते. म्हणूनच शास्त्रांमध्ये या पौर्णिमेला 'कोजागरव्रत' अर्थात कोण जागत आहे व्रत देखील म्हणतात. म्हणून या रात्री लक्ष्मी पूजा केल्याने सर्व कर्जांपासून मुक्ती मिळते. म्हणूनच शास्त्रात या शरद पौर्णिमेला 'कर्जमुक्ती' पौर्णिमा देखील म्हणतात.
- रात्री देवीच्या षोडशोपचार विधीने पूजा करून 'श्रीसूक्त' पाठ, 'कनकधारा स्तोत्र', विष्णू सहस्रनाम पाठ किंवा कृष्णाचं 'मधुराष्टकं' पाठ इष्ट कार्यात सिद्धी प्रदान करतं. पूजेत मिठाई, मेवे आणि खिरीचा नैवेद्य दाखवावा. रात्री मोठ्या पात्रात आटीव दूध किंवा खीर तयार करून खुल्या आकाशाखाली ठेवावं.