शरद पौर्णिमा अत्यंत श्रेष्ठ तिथी आहे. हा दिवस कोजागरी व्रत या रुपात देखील साजरा केला जातो. हा दिवस अत्यंत शुभ आणि सकारात्मक असून या दिवशी पूजा करुन मोठमोठाले संकट देखील दूर होतात असे मानले गेले आहे.
पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता. म्हणून धन प्राप्तीसाठी ही तिथी सर्वश्रेष्ठ असल्याचे मानले गेले आहे. या दिवशी प्रेमावतार भगवान श्रीकृष्ण, धनाची देवी लक्ष्मी आणि सोळा कला असणार्या चंद्राची उपासना करुन वरदान प्राप्त केले जाऊ शकतात.
शरद पौर्णिमा महत्व
- शरद पौर्णिमा अत्यंत महत्वपूर्ण तिथी आहे, या तिथीपासून शरद ऋतु आरंभ होते.
- या दिवशी चंद्र संपूर्ण आणि सोळा कला युक्त असतो.
- या दिवशी चंद्र किरणांहून अमृत वर्षा होते ज्याने धन, प्रेम आणि आरोग्य प्राप्ती होते.
- प्रेम आणि कलेने परिपूर्ण असल्यामुळे श्री कृष्णाने याच दिवशी महारास रचले होते.
- या दिवशी विशेष प्रयोग करुन आरोग्य, अपार प्रेम खूप धन प्राप्त करता येऊ शकतं.
- परंतू हे प्रयोग करण्यासाठी काही खबरदारी आणि नियम पालन करण्याची गरज असते.
शरद पौर्णिमेला काही महाप्रयोग करत असल्यास या तिथीचे नियम जाणून घेणे आवश्यक आहे.
- पौर्णिमेला सकाळी इष्ट देवाची पूजा करावी.
- इन्द्र आणि महालक्ष्मी पूजन करुन तुपाचा दिवा लावावा आणि त्याची गन्ध पुष्प इतर वस्तूंने पूजा करावी.
- ब्राह्मणांना खीरीचे भोजन करवावे आणि त्यांना दान- दक्षिणा प्रदान करावी.
- लक्ष्मी प्राप्तीसाठी हे व्रत विशेष रुपाने केलं जातं. या दिवशी जागरण करणार्यांच्या धन-संपत्तीमध्ये वृद्धि होते.
- रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच भोजन करावे.
- मंदिरात खीर व इतर वस्तू दान करण्याचे विधी-विधान आहे.
शरद पूर्णिमा सावधगिरी
- या दिवशी पूर्ण रूपाने पाणी आणि फळ ग्रहण करुन व्रत करावे.
- व्रत करणे शक्य नसल्यास या दिवशी सात्विक आहार ग्रहण करावे.
- शरीर शुद्ध आणि रिकाम्या पोटी असल्याने आपण योग्य रीत्या अमृत प्राप्ती करु शकाल.
- या दिवशी काळा रंग वापरु नये. पांढरे, चमकदार रंगाचे वस्त्र धारण करावे.