श्राद्धाचं अर्थ आपल्या देवता, पितर आणि वंशाप्रती श्रद्धा प्रकट करणे. हिंदू मान्यतेनुसार पिंडदान मोक्ष प्राप्तीचा एक सोपा मार्ग आहे. असं तर देशात अनेक ठिकाणी पिंडदान केलं जातं परंतू काही विशेष ठिकाणांवर श्राद्ध केल्याचं खूप महत्त्व आहे. याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते असे मानले गेले आहे.
1. गया
बिहारच्या फल्गु तटावर असणार्या गया येथे पिंडदानाचे खूप महत्त्व आहे. मान्यतेनुसार प्रभू राम आणि देवी सीतेने राजा दशरथ यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी गयामध्येच पिंडदान केले होते. गया या स्थळाला विष्णूंची नगरी मानले गेले आहे. ही मोक्ष भूमी म्हणून ओळखली जाते.
2. हरिद्वार
हरिद्वार येथे नारायणी शिलावर तरपण केल्याने पितरांना मोक्ष प्राप्ती होते. पुराण देखील याबद्दल उल्लेख सापडतात. पितृ पक्ष दरम्यान जगभरातील भक्त येथे येऊन आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा-अर्चना करतात.
3. वाराणसी
वाराणसी देवांचे देव महादेवांची पवित्र नगरी आहे. लांब-लांबाहून भक्त येथे येऊन पिंडदान करतात. बनारसच्या अनेक घाटांवर अस्थी विसर्जन आणि श्राद्ध कर्म कांड केले जातात.
4. बद्रीनाथ
चार धाम यापैकी एक बद्रीनाथाला श्राद्ध कर्मासाठी महत्त्वपूर्ण स्थळ असल्याचे मानले गेले आहे. बद्रीनाथाच्या ब्रह्मकपाल घाटावर भक्त सर्वात अधिक प्रमाणात पिंडदान करतात. येथे निघणार्या अलकनंदा नदीवर पिंडदान केलं जातं.
5. अलाहाबाद
संगमावर पितरांचे तरपण करणे सर्वोत्तम मानले गेले आहे. येथे पिंडदान करण्याचं आपलंच महत्त्व आहे. अलाहाबादमध्ये पितृपक्षात मेळा भरतो जेथे लांबालांबाहून लोकं पूर्वजांचे श्राद्ध करण्यासाठी एकत्र होतात.
6. मथुरा
मथुरा हे श्रीकृष्णाची जन्मभूमी असल्याने पुराणात याचे अत्यंत महत्त्व आहे. येथे अनेक धार्मिक स्थळ असून वायुतीर्थ येथे पिंडदान केलं जातं. मथुरामध्ये तरपण करून लोकं आपल्या पूर्वजांना प्रसन्न करतात.
7. जगन्नाथ पुरी
चार धाम यात्रा केल्याने पुण्य प्राप्ती होते असे मानले गेले आहे. जगन्नाथ पुरी चार धाम यापैकी एक आहे. येथे पितरांच्या आत्म्याच्या शांती हेतू पूजा- पाठ केली जाते. संपूर्ण शहरात पिंडदानाची एक वेगळीच मान्यता आहे.