Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Nag Panchami 2023 Wishes in Marathi :नाग पंचमीच्या शुभेच्छा मराठी

Nag Panchami  2023 Wishes in Marathi :नाग पंचमीच्या शुभेच्छा मराठी
, सोमवार, 21 ऑगस्ट 2023 (07:05 IST)
Nag Panchami 2023 Wishes :
मान ठेवूया नाग राजाचा,
पूजा करून शिवशंकर भोले नाथाचा… 
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
रक्षण करूया नागराजाचे, 
जतन करूया निसर्गदेवतेचे 
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
वारूळाला जाऊया, 
नागोबाला पुजूया… 
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
हे नाग देवता, सप्र देवता सर्वांनां सुख, समृद्धी आणि आरोग्य दे… 
नागपंचमीच्याहार्दिक  शुभेच्छा
 
नागपंचमी निमित्त आपणास व आपल्या परिवारास मनपूर्वक शुभेच्छा
 
बळीराजाचा हा कैवारी, 
नागराजाची मुर्ती पुजूया घरोघरी… 
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
नागपंचमीच्या दिवशी तुमच्यावर ईश्वराची सदा कृपा असावी 
आणि तुमचे आयुष्य मंगलदायी असावे… 
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
हर हर महादेव…
 नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
 
देवांचा देव महादेवाला जो प्रिय, भगवान विष्णूचे जो आहे सिंहासन,
 ज्याने पृथ्वीला उंच केले अशा नागदेवाला
माझा त्रिवार नमस्कार… 
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
भगवान शंकराच्या गळ्यात सापाचा हार आहे… 
नागपंचमी शिवभक्तांसाठी खास उत्सव आहे. 
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
नागपंममीचा सण आला, पर्जन्यराजाला  आनंद झाला
न्हाहून निघाली वसुधंरा, घेतला हाती हिरवा शेला… 
नागपंचमीच्या शुभेच्छा
 
भगवान शंकराची कृपा झाली, सखेसवे मी नागपूजनाला निघाली… 
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
नागपंचमीचा  दिवस तुमच्या आयुष्यात यश आणि आरोग्य प्राप्त करो… 
आजचा दिवस शिवाला अर्पण करा
 नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
शेतकऱ्याचा मित्र नागदेवताची पूजा करण्याचा आज दिवस… 
नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
 
पवित्र महिन्यातील पहिला सण नागपंचमी… 
नागदेवतेची कृपा तुमच्यावर सदैव राहो… 
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 
 
दूध लाह्या वाहू नागोबाला, 
चल गं सखे जाऊ वारूळाला… 
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
नागोबाचे रक्षण करू. हीच खरी नागपंचमी… 
श्रावणातील या पहिल्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा
 
सण आला नागपंचमीचा, मनापासून शुभेच्छा तुम्हाला
सदैव सुखी, आनंदी राहा, हिच आमची सदिच्छा
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
पावसाच्या लपंडाव खेळण्याऱ्या सरी, 
सोन पिवळ्या उन्हाच्या मधूनच लकाकणाऱ्या लडी आणि हिरवे गालिचे लपेटलेली धरती,
अशा वातावरणाची परसात घेऊन
आला आला श्रावण महिना
या महिन्याच्या पहिल्याच पंचमीला पूजू या नागदेवतेला
नागपंचमीच्या शुभेच्छा…
 
चल गं सखे वारूळाला, वारूळाला, वारूळाला, 
नागोबा पूजायाला, पूजायाला, पूजायाला… 
नागपंचमीच्या शुभेच्छा
 
शिवशंभूचा हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी,
आज तुझा सण आला आहे नागपंचमी
नागपंचमीच्या शुभेच्छा
 
सर श्रावणाची सांगे, गोज गुपित कानात
झुला फांदीवरचा गं, श्रावणाचे गातो गीत
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
निसर्गाच्या बांधीलकीतून नागपंचमीचा सण निर्माण झाला, 
शेतकऱ्याचा मित्र तो सच्चा, शिवाच्या गळ्यातील हार झाला
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
जपायला हवं नागाच्या अस्तित्वाला
नको केवळ आंधळी पूजा
नाग दूध पित नाही कधीच
देऊ नका त्याला नाहक सजा
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
मातीच्या नागाची पूजा करा
जिवंत नागाचा नको अट्टाहास
तुमच्या अंधश्रद्धेमुळे होतो
नागाचा अन्नवयीत छळ आणि र्हास
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 
 
निसर्गाच्या बांधीलकीतून निर्माण झाला नागपंचमीचा सण,
शेतकरी आपल्या मित्राचे उतरवतो त्या निमित्ताने ऋण… 
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
समुद्र मंथनाने कळली जगास ज्यांची महती
अशा नागदेवांना सारे जग वंदती…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 
 
नागपंचमीच्या अमृततुल्य शुभेच्छा
पुंगीने नागाची आज मुलाखत घ्यावी, 
जनतेच्या वाट्याची खावी दूध मलाई, 
फणा अंहकाराचा डसता बाधा होई,
पुंगीच्या अंगागाची होई लाही लाही
नागपंमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
Edited By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विनायक चतुर्थी संपूर्ण माहिती मराठी