Nagpanchami भारतीय संस्कृती नागपंचमी या दिवशी नागाची देवता या रुपात पूजा केली जाते. पण आपल्या जाणून आश्चर्य वाटेल की केवळ भारतीय पौराणिक कथाच नव्हे तर ग्रीक पौराणिक कथांमध्ये देखील सापांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याची नोंद आहे. 'नाग पंचमी' हे हिंदू धर्मात श्रावण मासात साजरा केला जाणारा खूप महत्वाचा सण आहे. हिंदू धर्मात असे पण नागाला देवता म्हणून पुजलं जातं आणि ह्या दिवशी तर विशेषकर ह्यांची पूजा केली जाते. नाग पंचमीला लोकं नागाला दूध, दही, फुले, फळे इतर वस्तू अर्पित करून त्यांचे पूजन करतात.
पण काय आपण नाग पंचमी हा सण फक्त धर्माचे पालन, एक परंपरा म्हणून साजर करतो ? नाग पंचमी साजर कारण्यामागे देखील अनेक पौराणिक कथा सांगण्यात येत असल्या तरी ह्याचे वैज्ञानिक कारण आणि महत्त्व देखील तितकेच जाणून घेण्यासारखे आहे.
धर्म- संस्कृती : जर आपण हिंदू संस्कृतीप्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर नागपंचमी साजरा करण्याची वेगवेगळी कारण दिसून येतात. अशी मान्यता आहे कि नाग हे शिव शंभूंना प्रिय आहे आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण त्यांना 'नाग देवता' म्हणून पुजतो. अविवाहित मुली चांगला वर मिळावा आणि विवाहित बायका आपल्या कुटुंबाच्या सुख- समृद्ध आणि आयुष्यासाठी ह्या दिवशी नागांची पूजा करतात.
तथ्ये : एक मुख्य कारण म्हणून आपण हे समजावे की श्रावण मास म्हणजे पावसाळ्याचे दिवस आणि ह्या ऋतूमध्ये सापांसह इतर जीव भूमीच्या बाहेर निघतात, अशामध्ये सापांद्वारे मनुष्यांना हानी आणि त्रास होऊ शकतो. ह्याच्याशी स्वतःला वाचवण्यासाठी आणि सापांची पण सुरक्षा करण्यासाठी आपण नाग पंचमी साजरी करतो. साप हे रेपटाईल्स वर्गाचे जीव आहेत, म्हणजे सरपटणारे प्राणी. हे साधारणपणे दूध पित नाही कारण ते त्याला पचवू शकत नाही. आता आपल्या मनात हा विचार येईल की नाग पंचमीला तर नागाला दूध पाजलं जातं आणि नाग दूध पितो देखील तर त्यामागील कारण म्हणजे नाग पंचमीच्या 30-40 दिवसांपूर्वीपासून त्यांना निर्जलीत ठेवलं जातं आणि त्यामुळे जेव्हा आपण त्यांना नागपंचमीच्या दूध देतो ते पितात. पण काही वेळा सापाच्या फुफ्फुसात दूध शिरते, त्यामुळे त्याला न्यूमोनिया होतो. तज्ज्ञांच्या मते, दूध प्यायल्यानेही सापांचा मृत्यू होऊ शकतो. असे असूनही सर्वजण अंधश्रद्धेपोटी सापाला दूध अर्पण करतात.
प्रकृती किंवा पर्यावरणात सापांचा योगदान :
आपल्या पर्यावरणात असलेल्या प्रत्येक प्राणी किंवा जीव याचा इकोसिस्टमध्ये एक महत्वाचा योगदान असतो. सापांचा पण एक ठराविक योगदान आहे.
* साप, कीटक, उंदीर, आणि इतर जिवांना खातात ज्यामुळे ह्या कीटकांची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
* ते शेतात असलेले त्या जंतूंना खातात जे पिकाला नुकसान पोहोचवू शकतात आणि किंवा ते अन्न आपण खाल्ल्यानंतर विषारी रोग होऊ शकतात. ह्या प्रकारे ते '"शेतकऱ्यांचे मित्र" देखील आहे.
* सापांचे इतर प्रजातीचे जीव भक्षण करतात अशा प्रकारे अन्न-साखळीत महत्त्वाची भूमिका निभावतात.
* 'इकोसिस्टम-इंजिनियर' म्हणून साप 'दुय्यम बियाणे विखुरणे', म्हणजे बियांचा प्रसार करतात, अशा प्रकारे वनस्पतींच्या उत्पादनात मदत करत असतात.
* साप हे अनेक औषधांचे स्त्रोत देखील आहेत. सर्पदंशासाठी एकमेव सिद्ध आणि प्रभावी उपचार म्हणजे साप-विरोधी विष, हे देखील सापाच्या विषापासून तयार केलं जातं.
धर्म आणि संस्कृतीचे पालन करणे हे फार अभिमान, आनंद आणि कौतुकाचा विषय आहे. पण ह्यामुळे कोणत्याही जीवाला त्रास होऊ नये किंवा निसर्गाचं नुकसान होऊ नये याची काळजी घ्यावी. अशा कोणत्याही कृत्याला आपण समर्थन करू नये. हिंदू धर्मात जवळजवळ सर्व विधी आणि उत्सव याचे काही न काही वैज्ञानिक तथ्य असतात. अशात त्याचे महत्त्व जाणून सण साजरा केल्याने धार्मिक परंपरेप्रती विश्वास निर्माण होईल.