साहित्य : 4 वाट्या तांदूळ, अर्धी वाटी उडदाची डाळ, नारळाची पेस्ट अर्धी वाटी, लहान लिंबाएवढे लोणी, हिंग, तळण्यासाठी तेल.
कृती : तांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी लाल भाजून, बारीक दळावी. नंतर तांदळाचे पीठ व उदडाचे पीठ मिसळून, त्यात ओले खोबरे वाटून घालावे, लोणी घालावे व चवीप्रमाणे मीठ व हिंग घालून व पुरेसे पाणी घालून पीठ भिजवावे. भिजविलेल्या पिठाच्या बोराएवढ्या गोळ्या कराव्या व अर्धा तास पसरून ठेवाव्यात. नंतर त्या तेलात तळाव्यात.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा