Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बीएमडब्ल्यू परत करण्याचे म्हटलेच नाही: कर्माकर

बीएमडब्ल्यू परत करण्याचे म्हटलेच नाही: कर्माकर
अगरतळा- रिओ ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकर हिने तिला भेट म्हणून मिळालेली बीएमडब्ल्यू कार परत करण्याचे वक्तव्य आपण केलेच नाही, असे स्पष्ट केले आहे. सचिन तेंडुलकरच्या हस्ते भेट मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे ती भेट परत करण्यचा मी विचारही करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दीपाने दिली.
 
कलात्मक जिम्नॅस्टिक प्रकारात दीपा कर्माकर हिचे ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्य पदक थोडक्यात हुकले होते, पण ऑलिम्पिक क्रमवारीत चौथ्या स्थानी झेप घेणारी दीपा ही पहिली भारतीय महिला जिम्नॅस्टि ठरली.
 
दीपाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हैदराबाद बॅडमिंटन असोसिएशनकडून तिला सचिन तेंडुलकर याच्या हस्ते बीएमडब्ल्यू कार भेट म्हणून देण्यात आली होती. पण या कारचा देखभालीचा खर्च परवडत नसल्याच्या कारणाने दीपा तिला मिळालेली कार परत करणार असल्याचे वृत्त झळकले होते. पण हे वृत्त आता दीपाने फेटाळून लावले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शमीची खिलाडूवृत्ती