Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय क्रीडा महोत्सव

मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय क्रीडा महोत्सव
, गुरूवार, 17 नोव्हेंबर 2016 (14:27 IST)
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय क्रीडा महोत्सव दि. २१ व २२ नोव्हेंबर  रोजी आयोजित करण्यात आला आहे. या क्रीडा महोत्सवाचे उद्‌घाटन कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते सोमवार दि. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता के.टी.एच .एम महाविद्यालयाच्या मैदानावर संपन्न होणार होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान के.टी.एच .एम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर हे भूषविणार आहेत.
पारंपरिक महाविद्यालयांप्रमाणेच मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांच्या खिलाडू वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या १२ वर्षांपासून क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. विद्यापीठाच्या अमरावती, औरंगाबाद, नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड, कोल्हापूर या ८ विभागीय केंद्रांवर या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. विभागीय पातळीवर १००, २००, ४००, ८००, १५०० आणि ५००० मीटर अॅथलॅटिक्स, रिले, लांब उडी, उंच उडी, तिहेरी उडी, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक या वैयक्तिक क्रीडा प्रकारांत तर कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल या सांघिक खेळांतील स्पर्धांत प्रथम स्थान मिळविलेल्या ३५९ मुले आणि ४० मुली अशा एकूण ३९९ विद्यार्थ्याची या केंद्रीय क्रीडा महोत्सवासाठी निवड झाली आहे. या क्रीडा महोत्सवासाठी क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे व विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्राच्या प्रमुख डॉ. विजया पाटील यांनी केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बंद नाही पडणार 100 आणि 50 च्या नोटा