Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 5 April 2025
webdunia

आनंदने वेस्ली सोला परजित केले, नॉर्वे मध्ये संयुक्त पाचव्या स्थानावर

Vishwanathan Anand
, मंगळवार, 11 जून 2019 (14:24 IST)
माजी वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदने अमेरिकेच्या वेस्ली सोवर सहज विजय प्राप्त केली ज्यामुळे तो अल्टीबॉक्स नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या दौर्यानंतर संयुक्त रुपाने पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. 
 
आनंदने दाखवलं की का त्याला स्पीड किंग असे म्हटलं जात? त्याने वेस्लीविरुद्ध काळ्या मोहरांनी ड्रॉ खेळला आणि मग पांढर्या मोहरांसह जिंकून हा लढा 1.5 - 0.5 ने आपल्या नावावर केला. आनंदने पहिल्या 2 फेरीत पराभूत झाल्यानंतर उत्कृष्ट परतफेड करत सलग 3 विजय प्राप्त केल्या. यामुळे तो 5 गुणांसह संयुक्त 5व्या स्थानावर पोहोचला आहे.
 
या दरम्यान वर्तमान वर्ल्ड चॅम्पियन आणि स्थानिक खेळाडू मॅग्नस कार्ल्सनने आपले विजय मोहिम जारी ठेवताना फ्रान्सच्या मॅक्सिम वाचियार लाग्रेव्हला पराभूत केलं. तो 8 गुणांसह अव्वल बनलेला आहे. चीनच्या यू यंगाईने अमेरिकेच्या फॅबियानो कॅरुआनाला पराजित केलं आणि तो 6.5 गुणांसह दूसर्या स्थानावर आहे. लेव्होन अरोनियनने चीनच्या डिंग लीरेनला पराभूत केलं. त्याचे आणि वेस्ली सोचे सारखेच 6 - 6 गुण आहे जेव्हा की आनंद आणि  लीरेन संयुक्त पाचव्या स्थानावर आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाड्याने गर्भ देणार्‍या आणि घेणार्‍या दोन्ही महिला कर्मचार्‍यांना मिळणार प्रसूती रजा