खेळ कोणतेही असो, त्यात कर्णधाराची भूमिका ही महत्त्वाची असते. क्रिकेट, फुटबॉलसारख्या खेळांमध्ये कर्णधाराला आपल्या संघासमोर एक चांगला खेळाडूचे उदाहरण घालून द्यायचे असते. कणीण प्रसंगामध्ये आपले डोकं शांत ठेवून संघाला विज कसा मिळवून द्यायचा. हे प्रत्येक कर्णधाराचे पहिले ध्येय असते. मग या सगळ्यात कबड्डी कशी मागे राहिले. प्रो-कबड्डीतल्या यू मुम्बाचा कर्णधार अनुप कुमारच्या मते, आपल्या संघाला सतत चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन देणारा खेळाडू कबड्डीचा चांगला कर्णधार बनू शकतो. जर कर्णधार संघाला, आपण सामने जिंकू शकतो असा विश्वास दिला नाही, तर संघाला मैदानात चांगली कामगिरी करणेही कठीण होऊन बसते.