शारजाह मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल मानांकित म्हणून ग्रँडमास्टर आणि जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या एरिगे अर्जुनच्या नेतृत्वात भारतीय आव्हान असेल.19 भारतीय ग्रँडमास्टर शारजाह मास्टर्समध्ये सहभागी होतील.नऊ फेऱ्यांच्या या स्पर्धेतील विजेत्याला 12 हजार डॉलर्स मिळतील.
अर्जुनने रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धेत पाचवे स्थान पटकावले होते.अर्जुन खुल्या स्पर्धांमधून गुण गोळा करून नवीन मानके प्रस्थापित करत आहे. स्पर्धेत 2700 ELO रेटिंग वरील नऊ खेळाडू आहेत. अर्जुन दुसऱ्या मानांकित इराणच्या परहम मगसूदलूपेक्षा 29 गुणांनी पुढे आहे.