Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Commonwealth 2022: भारताच्या प्रियंका गोस्वामीने रेस वॉकिंगमध्ये जिंकलं रौप्य पदक

Commonwealth 2022: भारताच्या प्रियंका गोस्वामीने रेस वॉकिंगमध्ये जिंकलं रौप्य पदक
, शनिवार, 6 ऑगस्ट 2022 (17:32 IST)
photo @twitterकॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या प्रियंका गोस्वामीने महिलांच्या 10 किलोमीटरच्या रेस वॉकिंगमध्ये रौप्य पदकाची कमाई केलीय. यासह अॅथलेटिक्स स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 3 पदकं जिंकली आहेत.
 
प्रियंकानं 2020 च्या ऑलिम्पिकमध्येही याच स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्त्व केलं होतं.
 
दीपक पुनिया, बजरंग पुनिया, साक्षी मलिकने कोरलं सुवर्णपदकांवर नाव
भारताच्या दीपक पुनियाने पाकिस्तानच्या मोहम्मद इनामचा पराभव करून कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थच्या कुस्ती सामन्यातील भारताचं हे तिसरं सुवर्णपदक आहे.
 
यापूर्वी बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं होतं. आता या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे हे नववं सुवर्णपदक आहे.
 
दीपक पुनियाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. दीपक पुनियाच्या चमकदार कामगिरीचा अभिमान वाटतो, असं ट्विट मोदींनी केलं आहे.
 
पंतपध्रान मोदींनी म्हणतात, "दीपक भारताचा अभिमान आहे. त्याने भारताला अनेक सन्मान दिले आहेत. त्याने सुवर्णपदक जिंकल्याने प्रत्येक भारतीयाला आनंद झाला आहे."
 
साक्षी मलिकचं भारतासाठी आणखी एक सुवर्ण
भारताच्या साक्षी मलिकनं बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं आहे.
 
एका क्षणी साक्षी मलिक 62 किलो गटाच्या अंतिम फेरीत 0-4 अशी पिछाडीवर होती.
 
पण नेत्रदीपक पुनरागमन करताना तिने तिची प्रतिस्पर्धी कॅनडाच्या अॅना गोडिनेझला चकित केलं.
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थमधील कुस्तीतील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक होतं. यापूर्वी बजरंग पुनियाने सुवर्णपदक जिंकलं होतं.
 
सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साक्षी मलिकचे अभिनंदन केलं आहे.
 
त्यांनी ट्विट करून लिहिलं की, "बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत खेळाडू सतत अभिमानास्पद कामगिरी करत आहेत. मी सुवर्णपदक जिंकल्याबद्दल साक्षी मलिकचे अभिनंदन करतो. ती प्रतिभेचे शक्तिस्थान आहे."
 
बजरंग पुनियाने पटाकवले सुवर्णपदक
बजरंग पुनियाने बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 65 किलो वजनी गटात कुस्तीत सुवर्णपदक पटकावले आहे. हे कुस्ती प्रकारातील भारताचं पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे.
 
अंतिम सामन्यात कॅनडाचा खेळाडू लेचलान मॅकनीलचा पराभव करून त्यानं या पदकावर नाव कोरलं आहे.
 
अंशू मलिकला रौप्य पदक
बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अंशू मलिकला 57 किलो गटातील कुस्तीमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिला अंतिम सामन्यात नायजेरियाच्या फोलसाडे अडेकुरोयेकडून पराभव पत्करावा लागला.
 
दरम्यान, इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये यावर्षी 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान कॉमनवेल्थ गेम्सचं आयोजन करण्यात आलं आहे.
 
मागच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारत तिसऱ्या स्थानी राहिला होता.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Israel Gaza Missile War: इस्रायल-गाझामध्ये तणाव वाढला, दोन्ही देशांनी एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागली