Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दीपाने परत केली सचिनच्या हस्ते मिळालेली बीएमडब्ल्यू

दीपाने परत केली सचिनच्या हस्ते मिळालेली बीएमडब्ल्यू
अगरतळा- सचिन तेंदुलकरच्या हस्ते देण्यात आलेली बीएमडब्ल्यू कार परत केल्यानंतर भारतीय जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकरला 25 लाख रूपयांची रक्कम देण्यात आली आहे. त्या रकमेतून तिने ह्युंडाईची इलांट्रा कार विकत घेतली असल्याचे तिचे प्रशिक्षक बिस्वेश्वर नंदी यांनी म्हटले.
हैदराबाद येथे झालेल्या एक कार्यक्रमात सचिन तेंदुलकरच्या हस्ते साक्षी मलिक, पी व्ही सिंधू, गोपीचंद आणि दीपा कर्माकरला बीएमडब्ल्यू देण्यात आल्या होत्या. हैदराबाद बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष व्ही. चामुंडेश्वर यांनी या चौघांना कार दिल्या होत्या.
 
अगरतळामधील रस्ते अरूंद आहेत आणि खूप खड्डे आहेत त्यामुळे ती कार चालवणे अवघड होत असल्याचे तिने म्हटले होते. त्यामुळेच ही कार परत करण्याचा ती विचार करती होती. शिवाय, अगरतळामध्ये बीएमडब्ल्यू सर्व्हिस सेंटरदेखील नाही. तेव्हा इतकी महागडी कार सांभाळायची कशी असा प्रश्न तिला पडला होता. त्यामुळेच तिने आपली कार परत करण्याचा निर्णय घेतला होता. या निणर्याबद्दल तिने चामुंडेश्वर यांना कळवले. त्यांनी तिला कारच्या किमतीइतकी रक्कम देऊ असे म्हटले होते. ‍त्यांनी तिला 25 लाख रूपये देण्याचा निर्णय घेतला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बिलावल भुट्टो होणार पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते!