rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत नदाल, जोकोविचने पुढची फेरी गाठली

french open 2017
पॅरिस , शुक्रवार, 2 जून 2017 (13:34 IST)
राफेल नदाल व नोवाक जोकोविच यांनी आपापल्या सामन्यांमध्ये विजय मिळवत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत तिसर्‍या फेरीत धडक मारली. तर, महिला गटातील गतविजेत्या गार्बिनी मुगुर्झाला विजयासाठी तीन सेटपर्यंत झुंज द्यावी लागली. झेकची 20 वी मानांकित बार्बरा स्ट्रायकोव्हाचे आव्हानही दुसर्‍या फेरीत संपुष्टात आले. फ्रान्सच्या बिगरमानांकित एलिन्झ कॉर्नटने 6-1, 6-4 असे नमवले. 
 
आपले दहावे फ्रेंच ओपन जेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या राफेल नदालने रॉबिन हासेला एक तास व 49 मिनिटे चाललेल्या सामन्यामध्ये 6-1, 6-4, 6-3 अशा फरकाने  नमवले. पहिला सेट सहज जिंकल्यानंतर दुसर्‍या सेटमध्ये नदालला रॉबिनने चांगली टक्‍कर दिली; पण नदालने आपला खेळ उंचावत सेट आपल्या नावे केला. यानंतर तिसर्‍या सेटमध्येदेखील नदालने आपला हाच फॉर्म कायम ठेवत विजय निश्‍चित केला. सामन्यात केलेल्या कामगिरीने मी अत्यंत आनंदी आहे. सरळ सेटमध्ये विजय मिळवणे हे नेहमीच आनंददायी असते. या सामन्यात मी बर्‍याच गोष्टी योग्य केल्या असे मला वाटते, असे नदाल सामना संपल्यानंतर म्हणाला.
 
अन्य लढतीत गतविजेत्या नोवाक जोकोविचने पोर्तुगालच्या जोआओ सौसाला 6-1,6-4, 6-3 असे पराभूत करत केले. दुसर्‍या मानांकित जोकोविचचा सामना पुढच्या फेरीत अर्जेंटिनाच्या डिएगोशी होणार आहे. सामन्यातील पहिले दोन सेट मी चांगले खेळलो पण, तिसरा सेट मला कठीण वाटला. असे जोकोविच म्हणाला. सहाव्या मानांकित डॉमिनिक थीमने सिमोन बोलेलीला 7-5, 6-1, 6-3 असे नमवित पुढची फेरी गाठली. 
 
यासोबतच ग्रिगोर दिमित्रोव व डेविड गॉफिन यांनीदेखील पुढच्या फेरीतील स्थान निश्‍चित केले.  महिलांच्या एकेरीमध्ये गतविजेत्या असलेल्या मुगुर्झाने पहिला सेट गमावल्यानंतर अ‍ॅनेट कोंटावेटवर  6-7 (4/7), 6-4, 6-2 असे नमविले. सेरेना विल्यम्सची मोठी बहीण आणि दहावी मानांकित व्हीनस विल्यम्सनेही तिसर्‍या फेरीत प्रवेश करतांना जपानच्या नाराचा 6-3 आणि 6-1 असा फडशा पाडला. फ्रान्सची ख्रिस्तीयाना मॅल्डोन्विक, अमेरिकेची बेथानी मॅटेक सॅन्ड यांनीही दुसर्‍या फेरीत सहज विजय साजरे केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

#CT17: इंग्लंडची विजयी सलामी