Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारताची पाकिस्तानवर 3-2 ने मात

भारताची पाकिस्तानवर 3-2 ने मात
कुटांण , सोमवार, 24 ऑक्टोबर 2016 (10:44 IST)
आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ३-२ अशी दणदणीत मात केली. रमणदीप, रुपिंदर पाल सिंग आणि प्रदीप मोर यांनी केवळ एका मिनिटाच्या कालावधीत केलेल्या दणदणीत दोन गोलांच्या जोरावर भारताने आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला 3-2 अशा फरकाने पराभवाची धूळ चारली. या विजयामुळे 7 गुणांसह भारताने गुणतालिकेतील सर्वात वचरे स्थान पटकावले आहे.  
 
भारताने पहिल्या सामन्यात दुबळय़ा जपानचा १0-२ असा धुव्वा उडवत स्पर्धेत दणदणीत विजयी सलामी दिली, मात्र द. कोरिया विरुद्ध भारताला १-१ असे बरोबरीत समाधान मानावे लागले होते. पाकिस्तानला पहिल्या सामन्यात यजमान मलेशियाने पराभूत केले होते, तर दुसर्‍या सामन्यात कोरियावर केवळ एका गुणाने पाकने विजय मिळवला होता.यामुळे उपांत्य फेरीतील स्थान पक्के करण्यासाठी या सामन्यात दोन्ही संघांना. भारत आणि पाकिस्तानचा हॉकीमधील हा १६६ वा आंतरराष्ट्रीय सामना असल्यामुळे स्पर्धेत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही बाजूकडील खेळाडूंवर दडपण होते. पाकिस्तानने जोरदार सुरुवात करत भारतावर आक्रमण केले, मात्र उत्तम बचाव फळीच्या बळावर भारताने त्यांचे आक्रमण परतावून लावले.
 
आंतरराष्ट्रीय पातळीवर १३वा सामना खेळणारा युवा स्ट्रायकर प्रदीप मोरने पहिला गोल करत भारताचे खाते उघडले. त्याने २२ व्या मिनिटाला गोल केला. पिछाडीवर पडलेल्या पाकिस्तानने ३१ आणि ३९ व्या मिनिटाला गोल करत आघाडी वाढवली. मोहम्मद रिझवान आणि मोहम्मद इरफान यांनी अनुक्रमे ३१ आणि ३९ व्या मिनिटाला गोल केले. चेंडूवर ताबा मिळवण्याच्या स्पर्धेत भारताला ४३ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला.रुपिंदरपाल सिंहने मिळालेल्या संधीचे सोन्यात रुपांतर करत गोल केला. रमणदीप सिंगने तलविंदर सिंहच्या क्रॉसच्या बळावर ४४ व्या मिनिटाला गोल करत ३-२ अशी आघाडी घेतली.
 
भारताचा पुढील सामना चीन विरुद्ध २५ ऑक्टोबर आणि मलेशिया विरुद्ध २६ ऑक्टोबर रोजी असेल. भारताने चीनला पराभूत केल्यास उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्के होईल.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारताची किवींसवर मात