महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत केनयाच्या हेलेन ओबिरीने 14 मि. 34.86 सेकंदांत अंतिम रेषा ओलांडताना सुवर्णपदक जिंकले. इथिओपियाच्या अस्माझ आयानाने (14 मि. 40.95 सेकंद) रौप्यपदक पटकावले. तर हॉलंडच्या सिफान हसनने (14 मि. 42.73 सेकंद) कांस्यपदकाची निश्चिती केली. महिलांच्या थाळीफेकीत क्रोएशियाच्या सॅन्ड्रा पेर्कोविचने 70.31 मीटर फेक करताना जगज्जेतेपदाची निश्चिती केली. ऑस्ट्रेलियाच्या डॅनी स्टीव्हन्सने 69.64 मीटर फेकीसह रौप्यपदक जिंकले, तर फ्रान्सच्या मेलिना रॉबर्टने 66.21 मीटर फेक करताना कांस्यपदकाची कमाई केली.