कोरिया ओपन सुपर सीरिजमध्ये भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने जेतेपद पटकावलं आहे. वर्ल्ड चॅम्पियनशीपमधल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी न दवडता जपानच्या नोझेमी ओकुहारावर सिंधूने 22-20, 11-21, 21-18 अशा सेटमध्ये मात केली.
कोरिया सुपर सीरिज खिशात घालणारी ती पहिलीच भारतीय ठरली आहे.