Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाप्परे, कुस्ती खेळतांना पैलवानाचा मृत्यू

Palwana's death while wrestling
, बुधवार, 6 नोव्हेंबर 2019 (09:53 IST)
मध्य प्रदेशातील एका कुस्ती स्पर्धेत 19 वर्षीय कुस्तीपट्टूचा मैदानातच मृत्यू झाला. कुस्ती सुरु असताना पैलवानाचा हृदय बंद पडल्यानं मृत्यू झाला.  याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कुरई इथल्या बेलपेठ गावामध्ये कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोनू यादव नावाचा पैलवानही याठिकाणी स्पर्धेत सहभागी झाला होता. दोन मिनिटांपर्यंत कुस्ती सुरू असताना सोनूला हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी तो मैदानातच कोसळला. यावेळी प्रतिस्पर्धी पैलवानालाही काही अघटीत घडल्याची कल्पना आली नाही. जेव्हा सोनूची तब्येत बिघडल्याचं लक्षात आलं तेव्हा रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्यापूर्वीच सोनूचा मृत्यू झाला होता.
 
सोनूच्या मृत्यूनंतर पोलिसांनी या प्रकरणी नोंद करून घेतली असून सविस्तर चौकशी सुरू आहे. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार सोनूने एकापाठोपाठ एक कुस्त्या खेळल्या होत्या. थकवा आल्यानंतरही सोनू मैदानात उतरला होता आणि त्याच्यावर काळाने घाला घातला असं म्हटलं जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आरसेप करार वाटाघाटीत भारत सहभागी होणार नाही