Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बजरंग पुनियानला जागतिक कुस्ती स्पर्धेत तिसऱ्यांदा पदक

webdunia
शनिवार, 21 सप्टेंबर 2019 (10:53 IST)
भारताचा अव्वल पैलवान बजरंग पुनियाने जागतिक कुस्ती विजेतेपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आहे. बजरंगनं 65 किलो गटात कांस्यपदकाच्या लढतीत मंगोलियाच्या तुलगा तुमूर ओशीरवर 8-7 अशा फरकाने सनसनाटी विजय मिळवला आहे.
 
जागतिक कुस्ती विजेतेपद स्पर्धेतलं बजरंगचं हे आजवरचं तिसरं पदक ठरलं आहे. त्यामुळे जागतिक कुस्तीची तीन पदकं मिळवणारा तो भारताचा पहिलाच पैलवान ठरला आहे. याआधी 2013 आणि 2018 साली बजरंगनं या स्पर्धेत पदक मिळवलं होतं.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

RJ मलिष्काला जेव्हा मुंबईच्या खड्ड्यांमध्ये चंद्र दिसतो