Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोदी-सिंधूने खाल्ले आईस्क्रिम

मोदी-सिंधूने खाल्ले आईस्क्रिम
, सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (17:06 IST)
भारतीय खेळाडूंनी टोक्यो ऑलिम्पिक खेळामध्ये ऐतिहासिक कामगिरी करत सात पदक मिळवली. भारताच्या महिलांसह पुरुषांनी उत्कृष्ट कामगिरी करत इतिसाह रचला. यात एथलेटिक्समध्ये 100 हून अधिक वर्षानंतर सुवर्णपदक, हॉकीमध्ये 41 वर्षानंतर पदक अशा अनेक ऐतिहासिक कामगिरींचा समावेश असल्यामुळे भारतीय खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. खेळाडूंवर बक्षिसांचा पाऊस तर पडतच  आहे सोबतच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ऑलिम्पिकमधील सर्व सहभागी खेळाडूंना लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आमंत्रित करत त्यांचे अभिनंदन केले.
 
मोदींनी खेळाडूंशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. विशेष म्हणजे ऑलिम्पिकपूर्वी त्यांनी पीव्ही सिंधूला सोबत आईस्क्रिम खाण्याचे प्रॉमिसही पूर्ण केले. तर गोल्डन बॉय नीरज चोप्राला गोड पदार्थ चुरमा खायला दिला. पंतप्रधानांन नरेंद्र मोदी यांनी आघाडीची टेनिसपटू पीव्ही सिंधूला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर आपण सोबत आईस्क्रीम खाऊ असं प्रॉमिस केलं होतं. दरम्यान सिंधूने सेमीफायनलमध्ये पराभवानंतरही तिसऱ्या स्थानाचा सामना जिंकत कांस्य पदकावर नाव कोरलं म्हणून मोदींनी दिलेलं वचन पाळलं आणि तिच्यासोबत स्वांतत्र्य दिनादिवशी आईस्क्रिम खाल्लं.
webdunia
नीरज चोप्रा जेव्हा टोकियोहून परतले तेव्हा क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी वचन दिले होते की, पंतप्रधान मोदी त्यांना चुरमा खायला घालतील. त्याचबरोबर ऑलिम्पिकला जाण्यापूर्वीच पंतप्रधान मोदींनी सिंधूला वचन दिले होते की, जेव्हा तुम्ही टोकियोहून परत येता तेव्हा एकत्र आईस्क्रीम खाल. ही दोन्ही आश्वासने पंतप्रधानांनी पूर्ण केली आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील जनआशीर्वाद यात्रेसाठी ठाण्यात दाखल