Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दुहेरीत भारताच्या रामकुमार रामनाथन व पुरव राजा यांना विजेतेपद

दुहेरीत भारताच्या रामकुमार रामनाथन व पुरव राजा यांना विजेतेपद
पुणे , सोमवार, 18 नोव्हेंबर 2019 (10:30 IST)
एमएसएलटीए व पीएमडीटीए आयोजित आणि एटीपी व एआयटीए यांच्या मान्यतेने होत असलेल्या केपीआयटी एमएसएलटीए चॅलेंजर स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये विजेतेपदासाठीच्या लढतीत दुसऱ्या मानांकित ऑस्ट्रेलीयाच्या जेम्स डकवर्थने ग्रेट ब्रिटनच्या पाचव्या मानांकित जे क्लार्क याचा पराभव करत एकेरी गटाचे विजेतेपद संपादन केले. 
 
दुहेरी गटात भारताच्या रामकुमार रामनाथन व पुरव राजा या जोडीने भारताच्याच अर्जुन कढे व साकेत मायनेनी या जोडीचा पराभव करत विजेतेपद पटकावले. 
 
शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे- बालेवाडी येथील टेनिस संकुल येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरी गटात विजेतेपदासाठीच्या लढतीत दुसऱ्या मानांकित २७ वर्षीय ऑस्ट्रेलीयाच्या जेम्स डकवर्थने ग्रेट ब्रिटनच्या  जागतिक क्रमांक १८७ व स्पर्धेतील पाचव्या मानांकित जे क्लार्क याचा २ तास १८ मिनिट चाललेल्या सामन्यात ४-६, ६-४,६-४ असा तीन सेटमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले. पाच शस्त्रक्रियांना सामोरे गेल्यानंतर १८ महिन्यांच्या विश्रांतीनंतर डकवर्थने हे यश संपादन केले आहे. ही स्पर्धा जिंकल्यानंतर डकवर्थने ८२व्या स्थानासह जागतिक अव्वल १०० मध्ये आपले स्थान पुन्हा मिळवले आहे. यामुळे त्याचे ऑस्ट्रेलीयन ओपनच्या मुख्य फेरीतीन स्थान निश्चित झाले आहे.  
 
दुहेरीत विजेतेपदासाठीच्या लढतीत भारताच्या दोन्ही जोड्या समोरासमोर होत्या. यात रामकुमार रामनाथन व पुरव राजा या जोडीने अर्जुन कढे व साकेत मायनेनी या तिसऱ्या मानांकित जोडीचा ७-६(३), ६-३ असा टायब्रेकमध्ये पराभव करत दुहेरीचे विजेतेपद पटकावले. 
 
केपीआयटी पुरुष चॅलेंजर एकेरीतील विजेत्या खेळाडूला ७२०० डॉलर्स (५,१0,000 रुपये) आणि ८0 एटीपी गुण तर, उपविजेत्यास ४२४० डॉलर्स (३,00,000 रुपये) व ४८ एटीपी गुण. दुहेरीतील विजेत्या जोडीला ३१०० डॉलर्स आणि ८० एटीपी गुण तर, उपविजेत्या जोडीला १८०० व ४८ एटीपी गुण अशी पारितोषिके देण्यात आली. 
 
स्पर्धेचे पारितोषिक वितरण केपीआयटीचे व्यवस्थापकीय संचालक व पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. एमएसएलटीएचे  अध्यक्ष भरत ओझा, एमएसएलटीएचे मानद सचिव व स्पर्धा संचालक सुंदर अय्यर, नूतनीक्सचे व्यवस्थापकीय संचालक ए. बालकृष्णन, एमएसएलटीएचे  उपअध्यक्ष  प्रशांत सुतार, एमएसएलटीएचे सहसचिव राजीव देसाई, स्पर्धा सुपरवायजर  रोलँड हर्फेल,  एटीपी रेफ्री शीतल अय्यर, पीएमडीटीएचे  उपअध्यक्ष उमेश माने पीएमडीटीएचे खजिनदार कौस्तुभ शहा, आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
ऐकेरी गट- उपांत्य  फेरी
जेम्स डकवर्थ(2)(ऑस्ट्रेलीया) वि वि जे क्लार्क(5)(ग्रेट ब्रिटन) ४-६, ६-४,६-४
 
दुहेरी गट- उपांत्य फेरी    
रामकुमार रामनाथन(भारत)/पुरव राजा(भारत) वि वि अर्जुन कढे(भारत)/साकेत मायनेनी(भारत)(3)७-६(३), ६-३

- अभिजित देशमुख

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पार्किंगमधील वाहनांची जबाबदारी हॉटेलचीच: सर्वोच्च न्यायालय