अक्षय कुमार याच्यानंतर आता सायना नेहवाल गेल्या आठवड्यात छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राज्य राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करणार आहे. गेल्या आठवड्यात 11 मार्चला छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी आणि सीआरपीएफ यांच्यात चकमक झाली होती. या चकमकीत सीआरपीएचे 12 जवान शहीद झाले होते. या शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी नऊ लाख रुपयांची आर्थिक मदत अक्षय कुमारकडून करण्यात येणार आहे. अक्षय कुमारच्या मदतीनंतर बॅडमिंटनपटू सायना नेहवाल शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांप्रमाणे सहा लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. गेल्या आठवड्यात जे काही घडले त्याबद्दल सायना नेहवालने दु:ख व्यक्त केले. तसेच, दु:खात असलेल्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी ही मदत म्हणजे एक छोटेसे योगदान असल्याचे तिने म्हटले आहे.