Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिंधू, सायना, समीर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या दुसर्‍या फेरीत

सिंधू, सायना, समीर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या दुसर्‍या फेरीत
, गुरूवार, 25 एप्रिल 2019 (18:11 IST)
ओलंपिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप रजत पदक विजेता भरताची पी.व्ही. सिंधू, सातवी पदवी प्राप्त सायना नेहवाल आणि समीर वर्माने एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये बुधवारी आपले-आपले सामने जिंकून दूसर्‍या राउंडमध्ये प्रवेश केला जेव्हा की पाचवी पदवी प्राप्त किदाम्बी श्रीकांत उलटफेरचा बळी झाला आणि बाहेर पडला.
 
चौथी पदवी प्राप्त सिंधूने पहिल्या फेरीत, जपानच्या सयाका ताकाहाशीला केवळ 28 मिनिटांत 21-14, 21-7 असे पराभूत केले. या विजयासह सिंधूने ताकाहाशीविरुद्ध 4-2 असा करिअर रेकॉर्ड नोंदवला. गेल्या वर्षीच्या अखेरीस सिंधू वर्ल्ड टूर फायनलचे विजेतेपद जिंकल्यानंतर आपले पहिले शीर्षक शोधत आहे. 
 
सातवी पदवी प्राप्त सायनाने चीनच्या हान युईला एक तास आणि एक मिनिटांच्या कठीण संघर्षात 12-21, 21-11, 21-17 असे पराभूत केले आणि यासह तिने युई विरुद्ध 1-1 असा रेकॉर्ड केला. 
 
पुरुष सामनांमध्ये समीरने जपानच्या कजूमासा साकाईला 1 तास 7 मिनिटांत 21-13, 1 9 -21, 21-17 असे पराभूत केले. त्याने कजूमासा विरुद्ध आपला रेकॉर्ड 2-2 असा केला. 
 
पहिल्या फेरीत श्रीकांतला इंडोनेशियाच्या शेसर हिरेन रुस्तवितोने 44 मिनिटांत 21-16, 22-20 ने पराभूत करून बाहेर पाडलं. जगातील आठव्या स्थानाचा खेळाडू श्रीकांत, इंडोनेशियाच्या 51व्या स्थानावर असलेल्या या खेळाडूशी यापूर्वी 2011 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पराभूत झाला होता. 
 
सिंधूचा दुसर्‍या फेरीत इंडोनेशियाच्या चोरुनिसाशी टक्कर होईल जेव्हा की सायनासमोर कोरियाची किम गा युन असेल. दुसऱ्या फेरीत समीर हाँगकाँगच्या लॉंग एंगस विरुद्ध लढेल. 
 
पुरुष युगलमध्ये एमआर अर्जुन आणि रामचंद्रन श्लोक यांना पहिल्या फेरीत पराभव मिळाली तर महिला युगलमध्ये जे मेघना आणि पुर्विशा एस. राम आणि पूजा डांडु आणि संजना संतोष यांनी देखील सामने गमवले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

World Malaria Day: दोन मिनिटाला एक बळी घेणाऱ्या रोगाबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?