Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुमित नागल विम्बल्डनच्या पुरुष एकेरीच्या ड्रॉमध्ये खेळणार

Sumit Nagal
, गुरूवार, 23 मे 2024 (00:10 IST)
भारतीय टेनिस सुपरस्टार सुमित नागल हा या वर्षी होणाऱ्या तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डनच्या पुरुष एकेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये सहभागी होणार आहे. 2019 नंतर पहिल्यांदाच भारतीय खेळाडू विम्बल्डनच्या एकेरी ड्रॉमध्ये खेळताना दिसणार आहे. याआधी 2019 मध्ये, प्रजनेश गुणेश्वरन हा देशाकडून या स्पर्धेत खेळणारा शेवटचा खेळाडू होता, ज्याला पहिल्या फेरीतच कॅनडाचा खेळाडू मिलोस राओनिकने 6-7, 4-6 आणि 2-6 ने पराभूत केले होते.
 
नागलने याआधी 2018 मध्ये विम्बल्डनच्या पात्रता फेरीत भाग घेतला होता, ज्यामध्ये त्याला पोलिश खेळाडू रामिल मजचर्झाककडून सरळ सेटमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता.
 
या महिन्याच्या सुरुवातीला सुमितला जिनेव्हा ओपनच्या पहिल्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता फ्रेंचमध्ये चांगली सुरुवात करण्यासाठी नागलचे लक्ष असेल.
 नागलने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, फ्रेंच ओपन सुरू होण्यापूर्वी एक उत्कृष्ट सराव सत्र. नागलने आतापर्यंत टेनिस कोर्टवर उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

नागलने या वर्षाच्या सुरुवातीला चेन्नई ओपन जिंकून टॉप-100 मध्ये प्रवेश केला होता. नागलची आतापर्यंतची कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट रँकिंग 80 आहे, ज्याच्या आधारावर तो फ्रान्स ओपन 2024 साठी पात्र ठरला होता.

Edited by - Priya Dixit
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

KKR vs SRH: सामन्यानंतर शाहरुख खान अहमदाबादच्या रुग्णालयात दाखल