हैदराबाद- तेलंगणा सरकारने रिओ ऑलिंपिकच्या रजत पदक विजेता पीव्ही सिंधूला शॅकपेट गावात 1000 वर्ग गज जमीन वाटप केली. ऑलिंपिक पदक जिंकल्यावर सिंधूला तिच्या प्रदर्शनासाठी सरकारने ही जमीन देण्याची घोषणा केली होती आणि आपला वादा पूर्ण करत शॅकपेट गावात ही जमीन देण्यात आली.
सरकारने हैदराबाद जिल्हा कलेक्टरचा प्रस्ताव स्वीकार केल्यानंतर हा आदेश जारी केला होता. याव्यतिरिक्त सिंधूला पाच कोटी रूपयांचा रोख पुरस्कारही देण्यात आला होता.