Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टोकियो ऑलिम्पिकः पीव्ही सिंधू आणि बी साई प्रणीत यांना सोपे ड्रॉ, चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांना कठीण आव्हान मिळणार

टोकियो ऑलिम्पिकः पीव्ही सिंधू आणि बी साई प्रणीत यांना सोपे ड्रॉ, चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांना कठीण आव्हान मिळणार
, शुक्रवार, 9 जुलै 2021 (13:47 IST)
विश्वविजेती पीव्ही सिंधू आणि बी साई प्रणीत यांना 23 जुलैपासून सुरु होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सोपे ड्रॉ मिळाले असून दुसरीकडे चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांना कठीण आव्हाहनांना समोरी जावे लागणार. सिंधूला ग्रुप जेमध्ये, तर प्रणीत ला पुरुष एकेरीत ग्रुप डीमध्ये स्थान देण्यात आले आहे. चिराग आणि सात्विकची जोडी पुरुष दुहेरीत ग्रुप अ मध्ये खेळताना दिसणार आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी पीव्ही सिंधू यावेळी सुवर्ण पदक मिळवेल अशी आशा प्रत्येकाची आहे. 
 
गुरुवारी केलेल्या ड्रॉ मध्ये सिंधू सहाव्यांदा मानांकित झालेली महिला एकेरीत गट 'जे' मध्ये  सामील आहे तर पुरुष एकेरीच्या गट डी मध्ये प्रणीत 13 वे मानांकित आहे.जागतिक क्रमवारीत दहाव्या क्रमांकाच्या पुरुष दुहेरी जोडीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी गट अ मध्ये खेळणार आहेत.
 
 सिंधूचा सामना लीगच्या टप्प्यात हाँगकाँगच्या चेउंग निगान यी 34व्या क्रमांकावर) आणि इस्त्राईलची केसेना पोलिकार्पोवा (58 व्या क्रमांकावर) आणि सामनापूर्व उपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या 14 व्या मानांकित मिया ब्लिचफेल्डशी होणार आहे. प्रणीत ची लढत नेदरलँड्सच्या मार्क कालजोऊ (29 व्या क्रमांकावर) आणि इस्राईलच्या मिशा जिल्बरमैन (47 व्या क्रमांकावर) यांच्याशी होणार आहे. हैदराबादच्या  28-वर्षांच्या या खेळाडूने  गटात वरचा टप्पा गाठल्यावर त्याचा सामना ग्रुप सीच्या विजेत्याशी होईल .
 
वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने गुरुवारी ड्रॉ ची घोषणा केली, चिराग आणि सात्विकसाईराजला कठीण ड्रॉ मिळाला आहे .भारतीय या जोडीला इंडोनेशियाच्या के केव्हिन संजय सुकामूलजो आणि मार्कस फर्नाल्डी गिडीयॉन च्या शीर्ष स्थान पटकावलेल्या या जोडी शी लढा केल्यावर चीनच्या तैपेईची ली यांग आणि वांग ची लिन ची तिसऱ्या क्रमांकाची जोडी आणि इंग्लंडच्या बेन लेन आणि सीनवेंडी 18 व्या क्रमांकावर असलेल्या या जोडी शी सामना करायचा आहे.
 
दुहेरीत गटातील पहिले दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील.जर चिराग आणि सात्विक साईराज ने आपला गट अ मध्ये अव्वल स्थान पटकावला तर ते गट डीच्या उपविजेत्या जोडी  दुसर्‍या मानांकित मोहम्मद अहसन व हेंड्रा सेतियावान यांच्याशी सामना होईल तर दुसऱ्या क्रमांकावर असल्याने त्यांचा सामना ग्रुप बीच्या विजेते जपानचे खेळाडू हेरॉयुकी इंडो आणि युता वाटानाबे यांच्याशी होणार आहे. एकेरी स्पर्धेत, प्रत्येक गटातील अव्वल खेळाडू नॉक आऊट फेरीसाठी पात्र ठरतील.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्वीडनमध्ये विमान कोसळले, 9 ठार