rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निरक्षर आई ने दिलेले संस्कार मला आयुष्यभर पुरले..-अण्णा हजारे

Real Anna Hazare and Reel Annaji
पुणे , सोमवार, 17 ऑक्टोबर 2016 (16:56 IST)
माझी आई निरक्षर होती; सुरवातीला तीही माझ्याबरोबर उपोषणाला बसायची. तिने जे संस्कार दिले ते मला आयुष्यभर पुरले अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या जीवनाचे आणि जीवनातील लढाईचे सारे श्रेय आपल्या आई ला दिले आहेत.
 अण्णा हजारे यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपट  देशभर प्रदर्शीत झाला आहे आहे. यानिमित्ताने  पुण्यात खुद्द अण्णा हजारे यांनी तसेच चित्रपटाचे निर्माते मनिंदर जैन आणि दिग्दर्शक शशांक उदापूरकर यांनी नुकतीच पत्रकारपरिषद घेतली . यावेळी सुमारे अडीच तास अण्णांनी विविध विषयावर पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला
ते म्हणाले,' सर्जिकल स्ट्राईक चा राजकीय फायदा घेण्याच्या प्रकाराची आपण वारंवार निंदाच करू, मात्र आपल्या संरक्षणासाठी अहोरात्र सीमेवर झगडणाऱ्या सैन्यदलाविषयी शंका घेणे देखील आपण निषेधार्ह आहे, माझ्या आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आंदोलने कायमच चालू राहतील, ती थांबू शकत नाहीत , भ्रष्टाचार आणि अनागोंदी आजही माजलेली असली तरी त्याविरोधात मात्र जनजागृती समाजात  होत असल्याचे चित्र नक्कीच स्वागतार्ह आहे असेही अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले.
 
webdunia
ते पुढे म्हणाले, 'माझ्यासारख्या फकीर माणसाच्या जो मंदिरात राहायचा त्याच्या जीवनावर निघालेला ‘अण्णा‘ हा आगामी चित्रपट पाहून देशभरातील युवकांमध्ये 2011 च्या दिल्लीतील आंदोलनांप्रमाणेच पुन्हा जागृती व जोष निर्माण होईल, असे सांगतानाच, यानंतरही लोकपाल व लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी केली नाही, तर केंद्र सरकारच्या विरोधात आपण पुन्हा दिल्लीत येऊन आंदोलन करू, असा निर्धार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज येथे व्यक्त केला.
 
देशातील सहा लाख 38 हजार गावांतील युवाशक्ती जागृत झाली, तर देश रशिया-अमेरिकेच्याही पुढे निघून जाईल, असे मत व्यक्तकरून अण्णा म्हणाले, हा चित्रपट वास्तवावर आधारित आहे, काल्पनिक नाही. गाव, समाज व देशासाठी जीवन वाहिलेल्या व आयुष्यभर एका मंदिरात राहिलेल्या माझ्यासारख्या फकीर माणसावर हा चित्रपट आहे. मला अभिनय जमत नाही त्यामुळे मी चित्रपटातही दिसलो नाही. मात्र उदापूरकर यांनी माझी भूमिका
webdunia
चांगली वठविली आहे. माझे सारे जीवन देशासाठी आहे व पाकिस्तानने आपल्या कागाळ्या थांबवल्या नाहीत, तरी या वयातही सीमेवर जाऊन पुन्हा पाकशी लढण्याची माझी तयारी आहे. या चित्रपटाद्वारे कुटुंब व्यवस्थेतील संस्कार नव्या पिढीच्या मनावर पुन्हा ठसविण्याचा प्रयत्न केला आहे. माझी आई निरक्षर होती; मात्र सुरवातीला तीही माझ्याबरोबर उपोषणाला बसायची. तिने जे संस्कार दिले ते मला आयुष्यभर पुरलेले आहेत. माझे वय 79 आहे. माझ्या या पूर्ण आयुष्याचे चित्रण दोन तासांत करणे शक्य नाही; पण पैसा, पद, सत्ता हे काहीही नसताना भ्रष्टाचाराविरुद्ध एकाकीही लढण्याचा संदेश नव्या पिढीला त्यातून नक्की मिळेल.“
अण्णांच्या पत्रकार परिषदेतील काही अल्पशा भागाचा हा व्हिडीओ पहा ...

 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दीपिकाचा सुपरअॅक्शन अवतार