Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Akkalkot Swami Samarth Punyatithi 2026 Messages in Marahti श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त स्वामीं चरणी कोटी कोटी वंदन

अक्क्लकोट श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त स्वामीं चरणी कोटी कोटी वंदन
"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" 
हे अभयवचन देणाऱ्या अक्कलकोट निवासी 
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!
 
ज्यांच्या स्मरणाने दुःख हरते आणि संकटात धिर मिळतो, 
अशा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी पुण्यतिथी निमित्त नतमस्तक! 
स्वामी समर्थ जय जय समर्थ
 
देहाने जरी स्वामी अनंतात विलीन झाले असले, 
तरी भक्तांच्या हृदयात त्यांचे स्थान अढळ आहे
स्वामी पुण्यतिथी निमित्त त्यांच्या चरणी त्रिवार वंदन!
 
अशक्य ही शक्य करतील स्वामी... केवळ श्रद्धा हवी
श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
 
अक्कलकोट निवासी, भक्तांचे कैवारी पूर्णब्रह्म स्वरूप 
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या महाप्रयाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
 
स्वामी भक्ती आणि प्रेरणादायी संदेश
मनात स्वामींचे नाव, 
मुखी स्वामींचे गुणगान, हीच खरी भक्ती आणि हेच खरे समाधान
स्वामी पुण्यतिथी निमित्त सर्व स्वामी भक्तांना मनापासून वंदन
 
संकटे कितीही मोठी असोत, 
ज्याच्या पाठीशी स्वामी उभे आहेत 
त्याला कशाचेही भय नाही
श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत!
 
 
 
स्वामी म्हणजे आधार, स्वामी म्हणजे विश्वास
जीवनाच्या प्रत्येक वळणावर असणारा एक अतूट श्वास
श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त भावपूर्ण नमन!
 
 
 
कर्म करत राहा, 
फळाची चिंता नको, 
मी सदैव तुझ्या सोबत आहे
हेच स्वामींचे शिकवण आहे 
स्वामी पुण्यतिथी निमित्त महाराजांना कोटी कोटी प्रणाम!
 
 
 
अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज 
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त 
त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम! 
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देवी कुब्जिका जयंती: तांत्रिक साधना आणि वक्रेश्वरीच्या महिमेचा भव्य उत्सव