केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी संसदेत आर्थिक वर्ष 2019- 20 चा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. या दरम्यान औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या दैनंदिन उत्पन्नाच्या तुलनेत भोजनाची थाळी स्वस्त झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अहवाल सादर करताना सीतारामन यांनी 2006-07 च्या तुलनेत 2019-20 या 13 वर्षांमध्ये शाकाहारी भोजनथाळी 29 टक्क्यांनी आणि मांसाहारी थाळी 18 टक्क्यांनी स्वस्त झाल्याचे म्हटले आहे.
देशभरामध्ये उपलब्ध होणाऱ्या भोजनथाळीच्या अर्थशास्त्राचा विचार करता हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यासाठी 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील जवळपास 80 ठिकाणांहून औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकातून किमतीचा आढावा घेण्यात आला आहे.