Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता CBSE दहावी आणि बारावीची परीक्षा डिजीटल अ‍ॅडमिट कार्डाने होणार, डाऊनलोड चे नियम जाणून घ्या

आता CBSE दहावी आणि बारावीची परीक्षा डिजीटल अ‍ॅडमिट कार्डाने होणार, डाऊनलोड चे नियम जाणून घ्या
, सोमवार, 7 डिसेंबर 2020 (18:07 IST)
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला बघता CBSE ने यंदाच्या वर्षी दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी डिजीटल अ‍ॅडमिट कार्ड (Digital Admit Card) देण्याचा निर्णय घेतला आहे. आता विध्यार्थ्यांना या प्रवेश पत्रावर किंवा अ‍ॅडमिट कार्डावर शाळेच्या मुख्याध्यापकांच्या सहीसाठी शाळेच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही.
 
केंद्रीय मंत्री डॉ.रमेश पोखरियाल 'निशंक' म्हणाले की यंदाच्या वर्षी चढ-उतार असून देखील उत्तम इच्छा शक्तीने वेळेवर निकाल जाहीर करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे, जेणे करून विद्यार्थ्यांचे वर्ष वाया ना जावो. तसेच ते म्हणाले की कोरोनाच्या नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम देखील सुरूच राहणार. 
 
 
 
अशा प्रकारे डिजीटल प्रवेश पत्र डाउनलोड करावे - 
 
सीबीएसईच्या मान्यताप्राप्त असलेल्या शाळांच्या लॉग इन वर हे डिजीटल प्रवेश पत्र पाठविण्यात येईल. 
10 वी आणि 12वी चे विद्यार्थी शाळेच्या अधिकृत संकेत स्थळावरून हे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. या डिजीटल प्रवेश पत्रावर शाळेच्या मुख्याध्यापकांची डिजीटल स्वाक्षरी असेल. तसेच विध्यार्थ्यांच्या पालकांना देखील या अ‍ॅडमिट कार्डावर स्वाक्षरी करावी लागणार. शाळेकडून सर्व विध्यार्थ्यांना शाळेच्या वतीने खास यूजर आणि पासवर्ड देण्यात येईल. ज्याच्या मदतीने विध्यार्थी आपले अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड करू शकतील. या प्रवेश पत्रावर कोरोनाचा संसर्ग रोखण्याविषयाची माहिती पुरविली जाईल. या मध्ये हे सांगण्यात येणार की विध्यार्थ्यानी परीक्षा केंद्रावर कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवायचे आहे. विध्यार्थ्यांना मास्क आणि हॅन्ड सेनेटाईझर आवर्जून बाळगायचे आहे. मात्र अ‍ॅडमिट कार्डाची हार्डकॉपी विध्यार्थ्यांना आपल्या जवळ बाळगायची आहे. परीक्षा केंद्रावर याच कार्डाच्या साहाय्याने प्रवेश देण्यात येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Airtelची उत्तम योजना! दररोज 3 जीबी डेटा, फ्री कॉलिंग आणि Disney+ Hotstar VIP कमी किमतीत उपलब्ध