देशात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. हे संकट दिर्घकाळ चालणार असल्याने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाला Insurance Regulatory and Development Authority(IRDA)दिर्घ आणि छोट्या मुदतीच्या योजना आणण्याचे निर्देश दिले आहेत.
COVID Insurance Policy किंवा कोविड कवच विमा (COVID Kanach Bima)अशा स्वरुपात त्या योजना असणार आहेत. 50 हजारांपासून ते 5 लाखांपर्यंत हा विमा असू शकेल.
सर्व देशात यासाठी एकच प्रिमियम असावं असंही सांगण्यात आलं आहे. आणि त्याची रक्कम एकदाच भरावी लागणार आहे. भौगोलिक परिस्थिती किंवा इतर कारणांमुळे त्या योजनांचा प्रिमियम वेग वेगळा असू नये असे निर्देशही देण्यात आले आहेत.
या योजनेत COVID-19 सोबतच काही जुन्या आजारांवरही उपचार झाले पाहिजेत असंही IRDA(Insurance Regulatory and Development Authority)ने म्हटलं आहे. त्याचबरोबर, हॉस्पिटलमध्ये किंवा घरी उपचार झाल्यावर, आयुष मार्फेत उपचार झाल्यावर त्याचबरोबर आजारापूर्वी आणि नंतरच्या खर्चाचा समावेशही यात करण्यात आला आहे. 10 जुलैपूर्वी या योजना सुरू व्हाव्यात असेही निर्देश देण्यात आले आहेत.