Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

होळीत रंगल्या असतील नोटा तर या प्रकारे बदला

होळीत रंगल्या असतील नोटा तर या प्रकारे बदला
, मंगळवार, 30 मार्च 2021 (12:00 IST)
होळी खेळताना अनेकदा खिशात असलेल्या नोटांना रंग लागतो आणि त्या कामाचा नसतात कारण कोणीही त्या नोटा घेण्यास नकार देतात. अशात त्या नोटा कशा प्रकारे बदलता येतील हा मोठा प्रश्न असतो. अशात आम्ही आपल्याला याबद्दल संपूर्ण माहिती देत आहोत-
 
रंगीन नोटांचे काय करावे
रंगीन नोटा बाजारात चलनात आणणे कठिण असतं. अशात आपल्याकडे अशा नोटा असतील ज्या रंगल्या असतील किंवा फाटल्या असतील तर या बँकेत बदलता येतात. कोणतीही बँक नोटा बदलण्यासाठी नकार देऊ शकत नाही. तरी नोटांबद्दल काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर नोटा रद्दी देखील होऊ शकतात. आज आम्ही आपल्याला आरबीआयशी निगडित काही नियम सांगणार आहोत. आरबीआयच्या नियमांनुसार जाणून घ्या प्रक्रिया-
 
नोट रद्दी होतील
बस एक चुक टाळणे आवश्यक आहे नाहीतर आपल्या नोटा रद्दी होतील. भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने वर्ष 2017 मध्ये एक सर्कुलर जाहीर केले होते. यात स्पष्ट होते की बँक कोणत्या प्रकाराच्या नोटा स्वीकार करते आणि कोणत्या नाही. सर्कुलरप्रमाणे कोणत्याही नोटांवर राजनीतिक स्लोगन लिहिले असल्यास ते स्वीकार केले जात नाही. अशा नोटा कोणत्याही बँक स्वीकार करत नाही. आरबीआयने आपल्या सर्कुलरमध्ये स्पष्ट केले की असे नोट लीगल टेंडर नसणार. अर्थात अशा नोटा देशातील कोणतीही बँक मान्य करणार नाही. हे पूर्णपणे रद्दी होतील. मग त्यांची किंमत कितीही का नसो.
 
कोणत्याही शुल्कविना बदला नोटा
भारतीय रिझर्व्ह बँकेप्रमाणे कोणतीही बँक रंग लागलेल्या नोटा घेण्यास नकार देऊ शकत नाही. तथापि लोकांना सूचना दिल्या जातात की नोट घाण करु नये. आरबीआयच्या नियमांनुसार देशातील सर्व बँकांमध्ये फाटक्या, जुन्या, मुरगडलेल्या नोटा बदलता येतात बस त्या खोट्या नसाव्यात. म्हणून आपल्या जवळीत बँकेच्या ब्रांचमध्ये जाऊन नोटा बदलता येतील. यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही आणि यासाठी आपल्याला त्या बँकेचे ग्राहक असणे देखील गरजेचे नाही.
 
तीन प्रकाराच्या नोटा सोप्या पद्धतीने बदलता येतात
आरबीआयच्या नियमांनुसार तीन प्रकाराच्या नोटो बदलता येऊ शकतात. पहिल्या ज्यांचा धुण्यात, रंग लाग्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे रंग उडल्यास, दुसरा फाटक्या नोटा पण त्याचे तुकडे असणे गरजेचे आहे. आणि तिसर्‍या ज्या मिस मॅच आहेत म्हणजे ज्यांचे दोन वेगवेगळे तुकडे जोडून चुकीचं प्रिंट असेल. अत्यंत वाईट स्थितित असणार्‍या नोटा ज्यावरी नंबर वाचणे देखील शक्य नाही त्या बदलण्यास बँक नकार देऊ शकते. जर आपल्याकडे असलेल्या नोटा फिकट असतील किंवा फाटल्यास असतील पण त्यावरी सर्व आवश्यक माहिती दिसत असल्यास बँक अशा नोटा बदलण्यास नकार देऊ शकत नाही. सर्कुलरप्रमाणे बँकांना अशा नोटा बदलाव्या लागतात ज्यांचे दोन भाग झाले असतील परंतू नोटांवर आवश्यक ती माहिती असणे गरजेचं आहे. चिकटवलेल्या नोटा देखील बदलता येतात.
 
अशा नोटा बदलता येत नाही
तरी काही नोटा बदलणे कठिण आहे. नियमांनुसार जळलेल्या, अगदी तुकडे-तुकडे झालेल्या नोटा बदलता येत नाही. ज्यांच्यावर नारे किंवा राजनितिक संदेश लिहिलेले असतील, ज्यांचा वापर मुद्रा म्हणून करण्यात येत नाही. तसेच आपण हेतुपुरस्सर नोटा फाडल्याचे बँकेच्या लक्षात आल्यास तर त्या बदल्या जात नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुद्रांक शुल्कात 31 मार्चपर्यंत सवलत पण, नोंदणीसाठी चार महिने मुभा