Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

PF बद्दल Whatsapp द्वारे तक्रार नोंदवा, लगेच होईल सुनावणी

PF बद्दल Whatsapp द्वारे तक्रार नोंदवा, लगेच होईल सुनावणी
, बुधवार, 24 मार्च 2021 (16:49 IST)
कर्मचारी भविष्य निधि संघटन (ईपीएफओ) ने आपल्या ग्राहकांच्या तक्रारींवर तोडगा म्हणून एक व्हाट्सअॅप हेल्पलाइन नंबर लॉन्च केला आहे. ईपीएफओने तक्रारींच्या निराकरणासाठी यापूर्वी देखील अनेक प्लॅटफॉर्म सादर केले आहेत. व्हाट्सअॅप या श्रृखंलेत एक नवीन प्लेटफॉर्म आहे ज्याद्वारे ईपीएफ खाताधारक आपली तक्रार ईपीएफओ पर्यंत पोहचवू शकतात. 
 
व्हाट्सअॅप व्यतिरिक्त आपण ईपीएफआईजीएमएस पोर्टल, सीपीजीआरएएमएस आणि 24x7 कॉल सेंटर द्वारे देखील आपली तक्रार नोंदवू शकतात. 
 
या नवीन सुविधेमुळे ईपीएफ ग्राहकांना ईपीएफओच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये थेट संवाद साधण्याची संधी मिळते. सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये व्हाट्सअॅप हेल्पलाइन नंबर ईपीएफओच्या आधिकृत वेबसाइटच्या होमपेजवर उपलब्ध आहे. साथीच्या आजारात या हेल्पलाइनचा उद्देश ईपीएफओ आणि त्यांच्या ग्राहकांमध्ये संप्रेषणाचं सुलभ चॅनल आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. 
 
या सुविधेमुळे ग्राहक घरी बसल्या ईपीएफओ ऑफिसमध्ये न जाता थेट प्रश्न विचारु शकतात आणि आपली तक्रार नोंदवू शकतात. ईपीएफओ व्हाट्सअॅप आधारित सेवेचा उपयोग करण्यासाठी आपल्याला काही स्टेप्स फॉलो करावे लागतील, ज्याबद्ल माहिती दिली जात आहे. 
 
या प्रकारे करा ईपीएफओच्या व्हाट्सअॅप सर्व्हिसचा वापर - 
ईपीएफओची वेबसाइट (https://www.epfindia.gov.in/site_en/index.php) या वर क्लिक करा. 
आता आपल्या संबंधित क्षेत्रीय कार्यलयाचा व्हाट्सअॅप हेल्पलाइन नंबर शोधा. 
नंतर त्या नंबरला आपल्या फोनमध्ये जतन करा. 
व्हाट्सअॅप चॅट उघडा.
आपला प्रश्न किंवा तक्रार लिहून पाठवा. 
 
प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या वेगळा व्हाट्सअॅप हेल्पलाइन नंबर 
ईपीएफओची व्हाट्सअॅप हेल्पलाइन सेवा सर्व 138 क्षेत्रीय ईपीएफओ कार्यालयांमध्ये सक्रिय आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एक वेगळा व्हाट्सअॅप हेल्पलाइन नंबर असतो. यासाठी आपल्याला ईपीएफ खात्याच्या आपल्या क्षेत्रीय कार्यालय नंबरची माहिती असणे आवश्यक आहे.  
 
कसे शोधाल आपल्या क्षेत्रीय ऑफिसचा नंबर 
हे ड्रॉप-डाउन मेनू हून राज्य, ऑफिस लोकेशन आणि जिल्ह्याचे नाव सिलेक्ट करुन करता येईल. 
यासाठी Www.epndia.gov.in वा जावं. 
'सर्व्हिसेज' अंतर्गत 'फॉर एम्प्लॉयर्स' निवडा.
आता आपल्या स्क्रीनवर नवीन वेबपेज उघडेल. 
'सर्व्हिस' टॅब अंतर्गत 'एस्टेबलिश्मेंट सर्च' निवडा. 
लोकेशन किंवा लोकेशन कोड संख्या (केवळ 7 अंकी) वापरुन विस्तृत माहिती शोधा. देण्यात आलेल्या कॉलममध्ये डिटेल आणि कॅप्चा कोड टाकून 'सर्च' वर क्लिक करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना लॉकडाऊन : कठोर निर्बंधांचा भारताला किती फायदा झाला आणि किती तोटा?