Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Digital Voter ID डाउनलोड करा, जाणून घ्या पद्धत

Digital Voter ID डाउनलोड करा, जाणून घ्या पद्धत
, मंगळवार, 23 मार्च 2021 (16:00 IST)
कोणत्याही कामासाठी वोटर आयडी कार्डाची गरज पडते. मतदान ओळखपत्र एक आवश्यक डॉक्यूमेंट आहे. आता भारतीय निवडणूक आयोगाने डिजीटल वोटर आयडी ची सुविधा प्रदान केली आहे अशात आपण घरी बसल्या आपल्या आपल्या मोबाईल फोनवर हे डाउनलोड करु शकता.
 
या प्रकारे करा वोटर आयडी डाउनलोड-
 
e-EPIC अर्थात Elector’s Photo Identity Card एक सुरक्षित पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मेट आहे. हे PDF मोबाईल किंवा कंम्यूटरवर सेल्फ-प्रिंटेबल रुपात डाउनलोड करता येतं. आपण वोटर डिजिटल कार्ड आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करुन स्टोर करू शकतात किंवा याचे प्रिंट ही घेता येऊ शकतं. हे नॅशनल वोटर सर्विस पोर्टलवरुन डाउनलोड केलं जाऊ शकतं.
 
डिजिटल वोटर आयडी कार्ड डाउनलोड करण्यासाठी सोप्या स्टेप्स-
डिजिटल वोटर आयडी कार्ड डाउनलोड करण्यासाठी http://voterportal.eci.gov.in/ या लिंकवर जा. 
येथे एक अकाउंट तयार करा. 
नंतर लॉग-इन करुन वेबसाईटवर दिसणाऱ्या e-EPIC या पर्यायावर क्लिक करा. 
नंतर e-EPIC नंबर किंवा रेफरेंस नंबर टाका. 
नंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल. 
OTP सबमिट केल्यानंतर e-EPIC डाउनलोड करुन डिजिटल कार्ड डाउनलोड करता येईल.
 
कार्डवर रजिस्टर्ड मोबाईल नंबर वेगळा असल्यास हे डाउनलोड करण्यासाठी KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. KYC द्वारे मोबाईल नंबर अपडेट करुन कार्ड डाउनलोड करू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भगतसिंग यांच्या आयुष्यातले शेवटचे 12 तास कसे होते?