Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Computer Drive का आणि कधी अपडेट करावी, या प्रकारे करा अपडेट

Computer Drive का आणि कधी अपडेट करावी, या प्रकारे करा अपडेट
, मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020 (15:13 IST)
विंडोस मध्ये काही काळानंतर सर्व सॉफ्टवेअरमध्ये अद्यतन (updation) करावे लागते जेणे करून सर्व वेबसाइट व्यवस्थितरीत्या आपापले कार्य संपादन करावे हा हेतू असतो. आपल्या कॉम्प्युटरमधील ड्राइव्हर्सला वेळोवेळी अद्यतन केल्याने आपल्याला आपल्या सिस्टम बद्दल काळजी करायची गरज भासत नाही. अपडेट्स केल्याने आपले सिस्टम उत्तमरीत्या काम करण्यास तयार असतं.
 
यासाठी ड्राइव्हर्सला अपडेट करणे आवश्यक आहे. मग जाणून घेऊ या की आपण आपल्या विंडोसला अपडेट कसे करू शकता-
 
WOS (windows operating system) आजच्या काळातील सर्वात जास्त चालणारे आणि वापरले जाणारे os (आपरेटिंग सिस्टम) आहे. आजच्या काळात विंडोस 7, 8,10 हे सर्वात जास्त वापरले जाणारे आहे. कधी-कधी आपल्याला हे विंडोस वापरण्यात अडथळा येतो. जसे की कॉम्प्युटरची स्क्रीन व्यवस्थित काम करत नाही किंवा आवाज नीट येत नसतो. हे सर्व काही विंडोसच्या ड्राइव्हर्सला अद्यतन म्हणजेच अपग्रेड न केल्याने होते. आता तर विंडोस 10 मध्ये आपण आपल्या ड्राइव्हला सोप्या पद्धतीने अद्यतन करू शकता. ते कसे मग जाणून घेऊ या...
 
विंडोस ड्राइव्हला अद्यतन (अपडेट) कसे करावे?
 
आपण आपल्या ड्राइव्हला 2 सोप्या पद्धतीने अपडेट करू शकता. एक पद्धत आहे की आपण एखाद्या दुसऱ्या 'अॅप' चा वापर करून सिस्टमच्या सर्व ड्राइव्हला स्कॅन करून आपल्या ड्राइव्हला अपडेट करू शकता. दुसरी पद्धत म्हणजे आपण आपल्या सिस्टमनेच आपल्या ड्राइव्हला अपडेट करू शकता.
 
सर्वप्रथम जाणू या की कश्या पद्धतीने आपण आपल्या सिस्टमने ड्राईव्ह अपडेट करावे. त्या साठी काही गोष्टी जाऊन घेऊ या. आणि त्याचे पालन करू या. 
 
1 सर्वप्रथम आपण आपल्या सिस्टमला चालू करून इंटरनेटशी संलग्न करा. स्टार्ट या बटणावर माउसने क्लिक करा. स्क्रीनवर अनेक विकल्प येतील त्यातून 'कंट्रोल पॅनल' हा पर्याय निवडा. आता कंट्रोल पॅनलला सुरू करा. येथे आपणास अजून काही पर्याय दिसतील. त्यामधून 'हार्डवेअर आणि साऊंड' वर क्लिक करा. यामध्ये डिव्हाइस मॅनेजरला शोधा ते सापडल्या वर त्यामध्ये आपल्या कॉम्प्युटरच्या सगळ्या ड्राइव्हर्सची लिस्ट येईल. त्याला सर्व ड्राइव्हर्सला एकएक करून उघडा. त्यात ड्राइव्हर्समध्ये असलेले कम्पोनंट्स दिसतील. आता त्या यादीतून एका ड्राइव्हला निवडून त्याला उघडा त्यावर वरील बाजूस काही बटणे असतील त्यामधून अपडेट बटण वर क्लिक करा. ते उघडल्यावर त्यात पर्याय दिसतील की ड्राइव्हला 'ऍटोमॅटिक' करणे आणि दुसरे मॅन्युअली'. ऍटोमॅटिक वर क्लिक केल्यावर आपले सिस्टम स्वतःच ड्राडव्ह अपडेट करण्याचे कार्य करेल. आपल्याला कुठल्याही साईट वर जाण्याची गरज नाही. आपल्या सिस्टमची तपासणी केली जाईल. जर का आपले ड्राडव्ह अपडेट असेल तर एक संदेश येईल की आपले ड्राडव्ह अपडेटेड आहे आपण सिस्टम बंद करा आणि जर का ड्राडव्ह अपडेट नसेल तर आपले सिस्टम स्वतःच आधी डाउनलोड करेल आणि मग ते इंस्टाल करेल. अश्या प्रकारे आपण एक-एक करून आपल्या सर्व ड्राइव्हस अपडेट नसतील तर त्यांना अपडेट करू शकता.
 
2 दुसरी पद्धत आहे मॅन्युअली. येथे सर्वप्रथम ड्राइव्हरला डाउनलोड करणे नंतर त्याला अपडेट करावे लागणार. अशा प्रकारे आपण सिस्टमच्या एक-एक ड्राइव्हर्सला अपडेट करू शकता.
 
सध्याच्या काळात अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत जे आपल्या सिस्टमच्या ड्राइव्हर्सला स्कॅन करून त्यांना अपडेट करतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ट्रॅव्हल्स कंपनींच्या वाहन चालकांवर कारवाई