Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आपले आधार कार्ड बनावट तर नाही, ऑनलाईन तपासून बघा

आपले आधार कार्ड बनावट तर नाही, ऑनलाईन तपासून बघा
, शनिवार, 6 मार्च 2021 (08:10 IST)
प्रत्येक भारतीय नागरिकांना ओळखण्यासाठी आधार कार्ड हे एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. प्रत्येक सरकारी कामात ते आवश्यक आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण(UIDAI) द्वारे हे जारी केले जाते. या मध्ये यूजर्स किंवा वापरकर्त्यांची बायोमेट्रिक आणि लोकसंख्याशास्त्रा विषयक माहिती नोंदविली जाते.  
आपण ऑनलाईन पोर्टलद्वारे आधार क्रमांक खरा आहे की नाही हे तपासू शकता. यूआयडीएआयच्या म्हणण्यानुसार, कोणताही व्यक्ती नाव नोंदणीच्या वेळी किंवा आधार अपडेट करताना देण्यात आलेला ई मेल, पत्ता आणि मोबाईल नंबर सत्यापित करू शकतो. या व्यतिरिक्त आपण यूआयडीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन देखील आपले आधारकार्ड सत्यापित करू शकता.
 
यूनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया(UIDAI)च्या मते, कोणतेही 12 अंकी अंकांची संख्या हा आधार क्रमांक नसतो. अशा परिस्थितीत बऱ्याच वेळा बनावट आधार नंबरचा वापर केला जातो. या साठी UIDAI ने आधार कार्ड धारकांना एक सुविधा देण्यात आली आहे ज्या द्वारे ते त्यांच्या आधारकार्ड नंबर बरोबर आहे की नाही हे तपासू शकतात. या साठी काही टिप्स अवलंबवावे लागणार चला तर मग जाणून घेऊ या.  
 
*असं तपासू शकता -
* सर्वप्रथम  https://resident.uidai.gov.in/verify या संकेत स्थळावर क्लिक करा.  
* आधार व्हेरिफिकेशन पेज उघडेल. इथे एक टेक्स्ट बॉक्स दिसेल या मध्ये आपल्याला आपले 12 अंकीय आधार कार्ड द्यावे लागणार.
* या नंतर मोबाइलच्या डिस्प्ले मध्ये एक कॅप्चा कोड दिसेल, जे आपल्याला प्रविष्ट करावे लागणार.
*कोड प्रविष्ट केल्यावर व्हेरिफाय बटन वर क्लिक करा. आधार कार्ड नंबर बरोबर असल्यास एक नवीन पेज उघडेल. या पेजवर आपल्याला मेसेज येईल की आपण दिलेला आधार नंबर हाच आहे.  
या शिवाय, या पेजवर आपल्या आधार कार्डशी निगडित सर्व माहिती देखील उघडेल. या मध्ये आपले वय, लिंग, जन्मतारीख आणि राज्याचे नाव देखील दिसेल.  
 
* अशा प्रकारे आपण तक्रार नोंदवू शकता-
जर आपला आधार क्रमांक चुकीचा आहे तर इथे कोणतीही माहिती दर्शविली जाणार नाही. आपले आधार कार्ड बनावट असल्यास आपण नजीकच्या आधार कार्ड सेंटरवर जाऊन नवीन आधार कार्ड बनवू शकता.
आधार कार्डाशी निगडित कोणतीही तक्रार नोंदविण्यासाठी आपण UIDAI च्या टोलफ्री नंबर 1947 वर कॉल करून आपली कोणतीही तक्रार नोंदवू शकता.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणे मेट्रोला वेगवेगळ्या पातळ्यांवर तीन आयएसओ मानांकन