Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आपला स्मार्टफोन बनावट आहे का? काही मिनिटांत या प्रक्रिया अवलंबवून ओळखा

आपला स्मार्टफोन बनावट आहे का? काही मिनिटांत या प्रक्रिया अवलंबवून ओळखा
, मंगळवार, 1 मार्च 2022 (17:27 IST)
हे स्मार्टफोनचे युग आहे. प्रथम सामान्य मोबाईल फोन आले, ज्यावरून आपण फक्त कॉल किंवा संदेश करायचो. पण सध्या लोकांकडे असे मोबाईल आहेत ज्यातून केवळ कॉल किंवा मेसेजच नाही तर इतर अनेक कामेही सहज करता येतात. फोटो क्लिक करणे, व्हिडीओ बनवणे याशिवाय अनेक गोष्टी स्मार्टफोनने एका क्लिकवर केल्या जातात. लोक दुकानात जाऊन त्यांच्या आवडीचे लेटेस्ट स्मार्टफोन विकत घेतात, पण आता लोक ऑनलाइनही बरेच मोबाईल खरेदी करतात. लोक दुकानात जाण्याऐवजी ऑनलाइन खरेदीकडे अधिक रस दाखवत आहेत. अशा परिस्थितीत, ऑनलाईन वरून खोटे मोबाइल फोन मिळू नयेत, अशीही चिंता वाटते . अशा परिस्थितीत आपण ऑनलाईन वरून खरेदी केलेला आणि वापरत असलेला मोबाईल खरा आहे की खोटा हे जाणून घेणे आवश्यक आहे. जर आपल्याला याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर मोबाईल खरा आहे की बनावट ते कसे ओळखायचे जाणून घ्या.
 
ही प्रक्रिया करा -
*  मोबाईल फोन खरा आहे की खोटा हे जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी आपल्याला एक  मेसेज पाठवावा लागेल. वास्तविक, दूरसंचार विभागाने काढलेल्या पद्धतीद्वारे आपण मोबाईलचे खरे-खोटे शोधू शकता.
 
* संदेश पाठवावे-
आपल्याला मोबाईलवरून मेसेज पाठवायचा आहे.  मेसेजमध्ये KYM टाइप करून स्पेस द्यावी लागेल आणि त्यानंतर 15 अंकी IMEI नंबर टाकावा लागेल. त्यानंतर हा संदेश 14422 या क्रमांकावर पाठवा.
 
* येथून IMEI नंबर तपासा- 
जर आपल्याला मोबाईलचा IMEI नंबर माहित नसेल, तर  मोबाईलच्या बॉक्समधून, मोबाईल सेटिंगमध्ये जाऊन किंवा *#06# डायल करून तो शोधू शकता.
 
* संदेशातून माहिती मिळेल- 
 जेव्हा आपण मोबाइल फोनच्या IMEI क्रमांकासह 14422 क्रमांकावर संदेश पाठवता तेव्हा  दुसऱ्या बाजूने एक संदेश येईल. या प्राप्त झालेल्या संदेशात आपल्या मोबाईल फोनची सर्व माहिती असेल.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवीन शेखरप्पा मृत्यूच्या तीन तास आधी कुटुंबाशी बोलले, किराणा सामान घेण्यासाठी बाहेर पडले होते