Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोदी सरकारने खात्यात पाठवले 19100 कोटी रुपये, नवीन यादीत असं तपासा तुमचं नाव

webdunia
शनिवार, 23 मे 2020 (16:44 IST)
केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Agriculture Minister Of India Narendra Singh Tomar) यांनी अशी माहिती दिली की, 24 मार्च 2020 ते आता या लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) जवळपास 9.55 कोटी शेतकरी परिवारांना 19,100.77 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. या योजनेसाठी तुम्ही अर्ज केला आहे आणि तुम्ही जाणू इच्छिता की लाभार्थ्यांच्या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही तर वेबसाइट pmkisan.gov.in इथे जाऊन तुम्ही तपासून पाहू शकता. याठिकाणी लाभार्थ्यांची नवीन यादी अपलोड होत आहे. राज्य/जिल्हा/तालुका/गाव याच्या आधारे तुम्ही या यादीमध्ये तुमचे नाव तपासून घेऊ शकता.
 
या योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana)फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. त्याशिवाय फायदा घेता येणार नाही. त्याचप्रमाणे 2000 रुपयांचा हप्ता मिळण्यासाठी बँक खाते असणे देखील अनिवार्य आहे. डीबीटीच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे पाठवले जातात. आधार आणि बँक खाते लिंक्ड असणे देखील आवश्यक आहे.
 
याठिकाणी तुम्ही तुमचे एखादे कागदपत्र जोडण्याचे राहून गेले असेल तर ते ऑनलाइन अपलोड करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही योजनेसाठी ऑनलाइन अर्ज देखील करू शकता.पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाला मदत व्हावी याकरता वार्षिक 6000 रुपये पाठवण्यात येतात. तीन महिन्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपये पाठवले जातात.
 
असे तपासाल तुमचे नाव
-जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला आहे आणि योजनेच्या यादीत तुमचं नाव आहे का हे तुम्हाला तपासायचे आहे, तर आता हे काम देखील ऑनलाइन शक्य आहे
 
-pmkisan.gov.in या वेबसाईटवर तुम्ही पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तपासू शकता
 
-याकरता शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या 'फार्मर कॉर्नर' या टॅबवर क्लिक करा. याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची या योजनेत नाव नोंदवण्यासाठी अर्ज करू शकता, त्याचप्रमाणे तुम्ही लाभार्थी असाल तर तुमची स्थिती देखील तपासून पाहू शकता.
 
-'फार्मर कॉर्नर'वर जाऊन 'लाभार्थी सूची' (लाभार्थी यादी) च्या लिंकवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, उप-जिल्हा आणि गावाची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही Get Report वर क्लिक केल्यास सर्व यादी मिळू शकेल.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

हर्षवर्धनजाधव यांनी राजकीय संन्यास घेतला