ATM मध्ये गेल्यात पण डेबिट कार्डच घरी विसरलात?
काळजी नको, या सोप्या पद्धतीने काढू शकता पैसे. आता विना कार्डदेखील पैसे (Cash Withdrawal without Debit Card) काढता येऊ शकतात. डिजिटल युगात हे शक्य झाले आहे. शिवाय यासाठी सिकेरिटीबाबतही जोखीम नाही.
एटीएधून (ATM) पैसे काढण्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. जर कधी पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेलात आणि कार्डच विसरलात तर मोठी पंचाईत होते. पण आता विना कार्डदेखील पैसे (Cash Withdrawal without Debit Card) काढता येऊ शकतात. डिजिटल युगात हे शक्य झाले आहे. शिवाय यासाठी सिकेरिटीबाबतही जोखीम नाही.
एनसीआर कॉर्पोरेशनने भारतात यूपीआय इनेबल्ड इंटरऑपरेबल कार्डलेस विड्रॉईंग सिस्टम लाँच केली आहे. NPCI A आणि सिटी युनियन बँकेसह पार्टनरशिपमध्ये ही सुविधा सुरू केली आहे. या पद्धतीने BHIM, Paytm, Gpay, Phonepe चा वापर करुन एटीएममधून पैसे काढता येऊ शकतात.
भारतात दोन बँका यासाठीची सुविधा देतात. SBI, YONO App चा वापर केला जातो. आणि दुसरी युनियन बँक, जी UPI A आधारित पैसे काढण्याची सुविधा देते.
- सर्वात आधी ATM मध्ये जा, जिथे कार्डलेस पैसे काढण्याची सुविधा दिली जाते. देशभरात 1500 असे एटीए आहेत, जे यासाठी सपोर्ट करतात.
- ATM मधून पैसे काढण्यासाठी स्मार्टफोनमध्ये कोणतेही UPI App ओपन करावे लागेल.
- UPI App ने QR Code ला स्कॅन करावे लागेल.
- जितके पैसे काढायचे आहेत, ते टाका.
- ट्रान्झेक्शन पूर्ण झालनंतर एटीएधून पैसे काढता येतील.
- जर तुचे SBI अकाउंट असेल, तर YONO App डाउनलोड करावं लागेल.
- त्यानंतर आयडी, पासवर्ड किंवा एप पिनचा वापर करुन लॉगइन करा.
- SBI ATM मध्ये जा आणि QR Code द्वारे पैसे काढण्याच्या पर्यायावर क्लिक करा.
- जितके पैसे काढाचे आहेत, ते टाका आता QR Code दिसेल.
- YONO App च्या होमपेजवर With QR Code Withdraw ऑप्शन निवडा.
- ATM मध्ये QR Code स्कॅन करा, त्यानंतर पॉपअप मेसेज येईल तिथे Continue वर क्लिक करुन पैसे काढता येतील.