Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये मतदान; मोदी, राहुल गांधींनी अशाप्रकारे केलं मतदानाचं आवाहन

उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये मतदान; मोदी, राहुल गांधींनी अशाप्रकारे केलं मतदानाचं आवाहन
, रविवार, 20 फेब्रुवारी 2022 (13:57 IST)
देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. आज संपूर्ण पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील काही मतदारसंघात मतदान होत आहे.
 
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग, माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, आपचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार भगवंत मान, पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांचे भवितव्य आज पणाला लागले आहे.
 
उत्तर प्रदेशात आज तिसऱ्या टप्प्यातले मतदान होत आहे. या टप्प्यात 16 जिल्ह्यांमधील 59 विधानसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. आजच्या मतदानात 627 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे.
 
सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. हाथरस, फिरोजाबाद, एटा, कासगंज, फारुखाबाद, कन्नोज, कानपूर ग्रामीण, झांसी, या ठिकाणी आज मतदान होत आहे. हे जिल्हे समाजवादी पार्टीचा गड समजले जातात.
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे करहल मतदारसंघातून उभे आहेत. आज त्या ठिकाणी मतदान आहे. त्यांच्याविरोधात भाजपने केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांना उभे केले आहे.
 
नेत्यांचं मतदारांना आवाहन
उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या नेत्यांनी मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या मतदारांना ट्विट करत मतदान करण्याची विनंती केली आहे.
 
''पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक आणि उत्तर प्रदेशातील तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे. सर्व मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करावं. विशेषतः तरुण आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांनी नक्की मतदान करावं,'' असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही उत्तर प्रदेशात तिसऱ्या टप्प्यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याची विनंती केली आहे.
 
''भीतीमुक्त, दंगलमुक्त आणि अपराधमुक्त राज्यासाठी, राष्ट्रवादाच्या विजयासाठी, 'आत्मनिर्भर आणि नव्या उत्तर प्रदेश'च्या निर्मितीसाठी तसंच प्रत्येकाच्या विकासाठी तुम्ही सर्वांनी मतदान नक्की करा. आधी मतदान, मग चहापान,'' असं योगी म्हणाले.
राहुल गांधी यांनी लोकांच्या बरोबर असलेल्या नेत्याला निर्भयपणे मतदान करण्याचं आवाहन ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनीही ट्विटद्वारे मतदारांना आवाहन केलं. ''पंजाबमध्ये आज मतदान होत आहे. तुम्ही सर्वानी प्रगतीशील बदलासाठी मतदानाच्या माध्यमातून घटनात्मक अधिकाराचा वापर करता. तुमचे मित्र, कुटुंबीयांनाही मतदानासाठी घेऊन जा कारण प्रत्येक मत अमूल्य आहे,'' असं चन्नी म्हणाले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जुन्या पुणे -मुंबई महामार्गावर रास्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प