Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

UP Election 2022 अखिलेश यादव यांची भेट घेतल्यानंतर इम्रान मसूद आता समाजवादी पक्षातच राहणार

Imran masood akhilesh yadav
, गुरूवार, 20 जानेवारी 2022 (22:25 IST)
पश्चिम यूपीचे मोठे मुस्लिम नेते इम्रान मसूद हे सपा मध्येच राहणार आहेत. लखनौमध्ये सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतल्यानंतर सर्व तक्रारी संपल्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडून सपा.

सहारनपूर ग्रामीण भागातील आमदार इम्रान यांच्यासोबत मसूद अख्तर यांनीही सपा मध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसमध्ये असतानाही इम्रान मसूद सातत्याने समाजवादी पक्षाशी युती करण्याबाबत बोलत होते.
 
इम्रान मसूद यांना यावेळी सहारनपूरमधील बेहटमधून निवडणूक लढवायची होती. पण समाजवादी पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही तेव्हापासून ते नाराज होते. त्यांचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला ज्यात ते म्हणत होते की मुस्लिमांनी आता एकत्र यावे. नंतर ते बसपमध्ये जातील अशा बातम्याही येऊ लागल्या होत्या मात्र चार ते पाच दिवस त्यांच्या समर्थकांशी बोलून लखनौला पोहोचले.
 
येथे अखिलेश यादव यांची भेट घेतली आणि आपलं मन त्याच्यासमोर ठेवलं. बैठक संपल्यानंतर काही वेळातच सपाने इम्रानचे निकटवर्तीय नेते अंजुम रागीब यांना सहारनपूरचे जिल्हाध्यक्ष केले. समाजवादी पक्ष आणि आरएलडी युतीसाठी इम्रान हे तत्परतेने काम करतील, असे ठरले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अर्थसंकल्प 2022: ही मागणी मान्य झाल्यास FD घेणार्‍या ग्राहकांची होईल मजा