Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चॉकलेट डे स्पेशल कविता

chocolate day
, मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (16:01 IST)
चॉकलेटच आकर्षण होतं बालपणी,
दिसताच चॉकलेट, तोंडाला येतं असे पाणी,
रावळगाव चॉकलेट आई देत असे,
आमची स्वारी त्यातही खुश होत असे,
आता तर बुवा हा चॉकलेट डे आला,
व्हॅलेंटाईन विक मधला एक दिवस भला,
देतील लोकं एकमेकांना चॉकलेट गोडीन,
अनमोल आम्हास जे आम्ही खात असू आवडीनं,
महिमा त्याचा असा की रडतं मूल लागे हसू,
वाढदिवसाला आम्ही शाळेत वाटत असू,
करा तुम्ही प्रेमभरे दिवस साजरा कसाही,
आम्ही आपले रमू लहानपणात आजही!!
अश्विनी थत्ते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दहावी पास उमेदवारांसाठी 13 हजाराहून अधिक जागा