Publish Date: Sat, 13 Feb 2021 (09:15 IST)
Updated Date: Sat, 13 Feb 2021 (09:18 IST)
आज तर काय म्हणे "किस"डे,
"कोरोना"साहेब आलेकी आडे,
पंचाईतच झाली बिचाऱ्या प्रेमवीरांची,
नसती ब्याद लागायची मागे कोरोना ची,
नको रे बाबा काही कीस फीस,
दुरूनच देऊ ,आपण फ्लाईंग कीस,
नसते आले कोरोना चे वादळ जगात,
प्रेमवीरांची झाली असती चांदी,
"चुंबन दिवस"झाला असता जोमात!!
पाळा बाबांनो सारे नियम काटेकोर,
नाहीतर उगीचच करावं लागेल"वन टू का फोर"!