Publish Date: Wed, 08 Feb 2023 (13:45 IST)
Updated Date: Wed, 08 Feb 2023 (14:15 IST)
सांगूनच देतो म्हटलं एकदाच, माझ्या घालमेल मनातली,
माझी होशील का?हीच इच्छा ग अंतरंगातली.
न लागते भूक, न लागे तहान ग मजला,
कसा न कळला जीव माझा तुझ्यात गुंतला,
हो म्हण अथवा नाही, ठरव तू तुझं,
तुझ्याच उत्तरावर ठरणार भवितव्य माझं,
पण सांगतो शपथेवर, देईल साथ सुखदुःखात,
दे हात हातात, करू या नवी सुरवात!