Publish Date: Mon, 06 Feb 2023 (07:04 IST)
Updated Date: Tue, 07 Feb 2023 (07:59 IST)
प्रेम व्यक्त करायचय, काहीतरी हवंय करायला,
हिंमत नाही होतं, जाऊन तिज सांगायला,
काहीतरी माध्यम हवं न , तिजवर पोहोचायला,
मला जे म्हणायचंय, ते न बोलता कळायला,
हे गुलाबाच्या मखमली फुलांनो, माझे दूत व्हा,
मखमली स्पर्शात तुमच्या, तुम्हीच व्यक्त व्हा,
देईन मी तिच्या हातात, एक गुच्छ गुलाबाचा,
दिवस आहेतच फुलायचे, घेतो सहारा तुमचा!
webdunia
Publish Date: Mon, 06 Feb 2023 (07:04 IST)
Updated Date: Tue, 07 Feb 2023 (07:59 IST)