Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Teddy Day 2023 टेडी बिअरचा रंग पाहून प्रेमाची भाषा समजा

teddy day
, गुरूवार, 9 फेब्रुवारी 2023 (23:04 IST)
प्रेमाचा महिना म्हणजेच फेब्रुवारी चालू आहे. या महिन्यात 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी ते व्हॅलेंटाईन वीक एखाद्या सणाप्रमाणे साजरा करतात. या आठवड्यातील प्रत्येक दिवस खास आहे. यासाठी जोडपे खूप आधीपासून प्लॅनिंग करायला लागतात.
 
व्हॅलेंटाइन वीकमध्ये प्रत्येक दिवसाचे स्वतःचे महत्त्व असते आणि भेटवस्तू देखील दररोज बदलल्या जातात. ज्याद्वारे आपण आपल्या जोडीदारापर्यंत आपले मन पोचवण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे टेडी डे 10 फेब्रुवारीला आहे. या दिवशी लोक त्यांच्या प्रियकर किंवा मैत्रिणीला टेडी बेअर भेट देऊन त्यांचे प्रेम व्यक्त करतात.
 
तुम्हाला बाजारात अनेक रंगांचे टेडी बेअर्स मिळतील. पण तुम्हाला माहित आहे का की प्रत्येक रंगाचे स्वतःचे असे महत्त्व असते. गुलाबाच्या रंगांप्रमाणेच टेडी बेअरमध्येही तुम्ही तुमच्या जोडीदाराला कोणत्या रंगाचा टेडी भेट द्यावा याचा विचार करावा लागेल.
 
आई लव्ह यू फॉरएव्हर म्हणजेच माझं तुझ्यावर कायम प्रेम आहे- लाल रंगाच्या टेडीला लाल रंगाचा हार्ट
आई लव्ह यू म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करतो - हृदयाच्या आकारात लाल रंगाचा टेडी
जर तुमचे थोडेसे प्रेम असेल किंवा प्रेमाची सुरुवातच झाली असेल तर- गुलाबी टेडी
आपली इच्छा दर्शवणे - गुलाबी रंगाचे टेडी आणि प्रेम पत्र
तुम्ही कोणाला मिस करत आहात - पिवळा टेडी
तुम्हाला लाँग ड्राईव्हवर, मूव्ही बघायला किंवा सोबत जायचे असेल तर- दोन लाल टेडी
तुमची मैत्री अगदी घट्ट असल्यास- तीन पिवळ्या रंगाचे टेडी

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

छत्रपती शिवाजी महाराजांवर 10 ओळींचा निबंध : 10 Lines essay on Shivaji Maharaj in Marathi