Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Valentine Day 2022: लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डे या प्रकारे खास साजरा करा

Valentine Day 2022: लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डे या प्रकारे खास साजरा करा
, शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (22:24 IST)
प्रेमी जोडप्यांसाठी फेब्रुवारी महिना खास असतो. या महिन्याच्या 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे आहे. लग्नाआधी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची क्रेझ असते, पण लग्नानंतर नवरा-बायकोचा पहिला व्हॅलेंटाइन डे असेल तर तो साजरा करण्याचा आनंद वेगळाच असतो. विवाहित जोडप्यासाठी ही पहिलीच वेळ आहे जेव्हा ते पती-पत्नी म्हणून नव्हे तर एक प्रेमळ जोडपे म्हणून एकमेकांवर प्रेम व्यक्त करू शकतात. आपण  जोडीदारावर प्रेम दाखवण्यासाठी काही खास करू शकता. आपला पहिला व्हॅलेंटाईन डे संस्मरणीय व्हावा असे प्रत्येकाला वाटत असते.
जर आपण  लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डे साजरा करणार असाल तर काही टिप्स अवलंबून जोडीदारासाठी हा दिवस खास बनवू शकता.
 
1 भेटवस्तूं देऊन सरप्राईज द्या -जर आपण लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डे साजरा करणार असाल तर या दिवशी पार्टनरला स्पेशल वाटू द्या. यासाठी आपण  जोडीदाराला सरप्राईज देऊन सकाळची सुरुवात करा. जोडीदार उठण्यापूर्वी , त्यांच्या उशाजवळ एक गोंडस भेट ठेवा. जोडीदाराला त्याच्या शेजारी ठेवलेली भेटवस्तू पाहून नक्कीच आनंद होईल.
 
2 गुलाब देऊन चेहऱ्यावर हसू आणा- व्हॅलेंटाईन डे गुलाबाच्या सौंदर्याआणि सुगंधाशिवाय अपूर्ण आहे. लाल गुलाब हे प्रेमाचे प्रतीक आहे. अशा परिस्थितीत त्यांना गुलाब द्या पण वेगळ्या पद्धतीने. व्हॅलेंटाईन डेच्या सामान्य दिवसांप्रमाणे, जर आपण जोडीदार ऑफिसमध्ये किंवा घरगुती कामात व्यस्त असेल तर काहीतरी वेगळे करून हा दिवस खास बनवा. अनोळखी व्यक्तीच्या हस्ते त्यांना गुलाब पाठवा. जर त्यांना दुसरे कोणतेही फूल आवडत असेल तर त्यांचे आवडते फूल आणि प्रेम संदेश पाठवा. असं केल्याने जोडीदाराला याचा धक्का बसेल.
 
3 प्रेम व्यक्त केल्याशिवाय व्हॅलेंटाइन डे अपूर्ण आहे .अशा वेळी त्यांना विशेष वाटण्यासोबतच आपल्या मनातील भावनाही व्यक्त करा. यासाठी आपण वेगवेगळ्या युक्त्या वापरू शकता. आजकाल बहुतेक लोक सोशल मीडिया फ्रेंडली आहेत. जर आपला पार्टनर सोशल मीडियावर खूप सक्रिय असेल तर याद्वारे त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करा. त्यांच्यासाठी आपल्या प्रोफाइल मध्ये बदल करू शकता. जर तुम्ही इंस्टाग्राम वापरकर्ता असाल तर त्यावर  जोडीदाराचे नाव जोडून आपले नाव ठेवा. किंवा तुम्ही व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर डीपी आणि स्टेटस अपडेट करू शकता. चांगले स्टेटस टाकून आपले  प्रेम व्यक्त करा.
 
4 डिनर डेट -कोरोनाचा कालावधी सुरू आहे, अशा परिस्थितीत घराबाहेर पडणे सुरक्षित नाही. जर आपण घरी व्हॅलेंटाईन डे साजरा करत असाल तर आपण  रोमँटिक कँडल लाईट डिनरचे आयोजन करू शकता. बाहेर जात नसाल तरीही घरीच तयार व्हा आणि डिनर डेटचा आनंद घ्या. या साठी आपण बाहेरून जेवण मागवू शकता किंवा कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने जोडीदाराला त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून हा दिवस खास बनवू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चष्मा साफ करण्यासाठी या टिप्स अवलंबवा